ढोकेश्वर पतसंस्थेला १ कोटी ११ लाख नफा चेअरमन विजय कटारिया यांची माहिती ढोकेश्वर पतसंस्थेचा अर्थ सेवेचा आलेख उंचावणारा पारनेर प्रतिनिधी : पतस...
ढोकेश्वर पतसंस्थेला १ कोटी ११ लाख नफा
चेअरमन विजय कटारिया यांची माहिती
ढोकेश्वर पतसंस्थेचा अर्थ सेवेचा आलेख उंचावणारा
पारनेर प्रतिनिधी :
पतसंस्था क्षेत्रात नावलौकिक असलेल्या अल्पावधीतच गरुड भरारी घेतलेल्या टाकळी ढोकेश्वर येथील श्री. ढोकेश्वर पतसंस्थेला सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात १ कोटी ११ लाख रुपये नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन विजय कटारिया व व्हा. चेअरमन भाऊसाहेब लोंढे यांनी दिली आहे. तर दुसरीकडे संस्थेचे भाग भांडवल अतिशय चांगले असून संस्थेने चालू आर्थिक वर्षात नियमित कर्जफेड करणारांना रिबेट ( व्याज परतावा) देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय कटारिया यांनी दिली आहे.
श्री ढोकेश्वर पतसंस्थेच्या टाकळी ढोकेश्वर (पारनेर) साकुर (तालुका संगमनेर) म्हैसगाव (तालुका राहुरी )या ठिकाणी स्वमालकीच्या इमारती असून पळसपुर सुपा ( पारनेर) म्हैसगाव ( राहुरी) साकुर घारगाव ( संगमनेर) या ठिकाणी नवीन शाखा सुरू करण्यात येणार असल्याचेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अशोक कटारिया अध्यक्ष विजय कटारिया उपाध्यक्ष भाऊसाहेब लोंढे भागुजी झावरे पाराजी वाळुंज भास्कर खटके रामचंद्र रोकडे व्यवस्थापक प्रशांत पायमोडे यांच्यासह संचालक उपस्थित होते.
या संस्थेकडे ४७ कोटी ८० लाख ठेवी असून ३९ कोटी २८लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वितरण केले असल्याची माहिती अध्यक्ष विजय घाटे यांनी दिली आहे.तर संस्थेकडे भागभांडवल ९७ लाख २६ हजार रुपयांचे असून खेळते भांडवल ६९ कोटी ३५ लाख ५५ हजार रुपये असल्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब लोंढे यांनी सांगितले.
तर दुसरीकडे संस्थेच्यावतीने कोअर बँकिंग मोबाईल बँकिंग सेवा लाॅकर सुविधा सुरू करण्यात आली असून आर.टी.जी.एस व एन.ई.एफ.टी. सुविधा चालु करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. अनेक वर्षापासून सभासदांना लाभांश वाटपाची परंपरा या संस्थेने यावेळी कायम राखली असून सभासदांच्या हिताचे निर्णय संस्था घेत असल्याचे संस्थेचे संस्थापक अशोक कटारिया यांनी सांगितले आहे.
कोरोनामुळे आर्थिक संकट व शेतकरी वर्ग अडचणीत असतानाही संस्थेची वसुली व संस्थेचे कामकाज कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व्यवस्थित चालले असल्याचे ही सांगण्यात आले आहे. तरी सभासदांनी संस्थेशी संपर्क ठेवून व्यवहार करावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ व मॅनेजर यांनी केले आहे. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह ठराविक सभासदांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत विविध विषयावर चर्चा पण करण्यात आली.
ढोकेश्वर पतसंस्थेचा अर्थ सेवेचा आलेख उंचावणार
टाकळी ढोकेश्वर येथे गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी व व्यावसायिकांसाठी अर्थ सेवा देण्यासाठी ढोकेश्वर पतसंस्थेची निर्मिती अशोक कटारिया यांनी केली आज हीच पतसंस्था सामाजिक हेतूने अर्थ सेवा देत असून या संस्थेचा अर्थ सेवेचा आलेख उंचावणारा आहे.