निघोज मध्ये घरफोडी; दोन लाखाचा माल पळवला पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील निघोज येथील पांढरकरवाडीत घरफोडी झाल्याची घटना घडली. अज्ञात चोरट्यांन...
निघोज मध्ये घरफोडी; दोन लाखाचा माल पळवला
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील निघोज येथील पांढरकरवाडीत घरफोडी झाल्याची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दोन लाख दोन हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोपट नामदेव पांढरकर (वय ५५, रा. पांढरकरवाडी, निघोज, ता. पारनेर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. रात्री पांढरकर घराबाहेर झोपलेले असताना घराला कुलूप लाऊन चावी इलेक्ट्रीक बोर्डावर ठेवलेली होती. चोरट्यांनी कुलूप उघडून घरा - तील एक लाख ७५ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने आणि २७ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उगले तपास करत आहेत.