सहकार क्षेत्राला पद्मश्री डॉ. विखे मुळे बळकटी : राहुल पाटील शिंदे सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे यांना पारनेर येथे अभिवादन पारनेर/प्रतिनिधी : ...
सहकार क्षेत्राला पद्मश्री डॉ. विखे मुळे बळकटी : राहुल पाटील शिंदे
सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे यांना पारनेर येथे अभिवादन
पारनेर/प्रतिनिधी :
सहकार चळवळीचे जनक सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी पारनेर येथे त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरी करण्यात आली. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्य जनतेसाठी सहकार क्षेत्रात केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे. सहकारी तत्त्वावर लोणी प्रवारा येथे आशिया खंडातील पहिला साखर कारखाना त्यांनी उभा केला. खऱ्या अर्थाने त्यामुळे उद्योग सहकार क्षेत्राला बळकटी मिळाली.
पारनेर येथे पद्मश्री डॉ. विखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना पारनेर तालुका दूध संघाचे मा. अध्यक्ष राहुल पाटील शिंदे म्हणाले की सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे सहकार क्षेत्रातील कार्य हे महत्त्वपूर्ण असून त्यांनी सहकार क्षेत्र जिवंत ठेवण्यासाठी जे काम उभे केले आहे ते समाज हिताचे होते. त्यांनी सहकार क्षेत्राला बळकटी मिळण्यासाठी सहकार क्षेत्र टिकला पाहिजे यासाठी शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य समाजाला सोबत घेऊन ज्या सहकारी तत्त्वावर संस्था चालवल्या त्याचा सर्वसामान्य जनतेला फायदा झाला अनेक गोरगरिबांची कुटुंब त्यातून उभी राहिली.
तसेच पारनेर भाजपाचे किरण कोकाटे यावेळी बोलताना म्हणाले की पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे पारनेर तालुक्यावर विशेष प्रेम होते. पारनेर सहकारी साखर कारखाना निर्मितीमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण योगदान आहे. पारनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन पारनेर येथे करण्यात आले. यावेळी पारनेर तालुका दुध संघाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, भारतीय जनता पार्टीचे पारनेर शहर अध्यक्ष किरण कोकाटे, कडूसचे सरपंच मनोज मुंगसे, पत्रकार मार्तंड बुचडे सर, ऋषिकेश गंधाडे, युवा नेते स्वप्नील औटी, सचिन धोत्रे, आनंद खाडे, योगेश औटी, अडसूळ सर व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.