वाढदिवस विशेष.. पठार भागावरील आक्रमक युवा चेहरा किरणभाऊ ठुबे युवकांचे मोठे संघटन असलेलं नेतृत्व सामाजिक दृष्टिकोन ठेवून कार्य तळागाळातील जन...
वाढदिवस विशेष..
पठार भागावरील आक्रमक युवा चेहरा किरणभाऊ ठुबे
युवकांचे मोठे संघटन असलेलं नेतृत्व
सामाजिक दृष्टिकोन ठेवून कार्य
तळागाळातील जनमानसापर्यंत संपर्क असलेला नेता
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात ज्यांचे मोठे योगदान राहिले असे पारनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती स्व. रावसाहेब अण्णा ठुबे होय. रावसाहेब अण्णांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालवणारे त्यांचे चिरंजीव पठार भागावरील आक्रमक युवा चेहरा व युवकांच्या गळ्यातील ताईत जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण रावसाहेब ठुबे, किरण भाऊंनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवताना पठार भागावर युवकांचे मोठे संघटन उभे केले.
स्व. संदीप पाटील वराळ यांच्या सहकार्याने जाणता राजा प्रतिष्ठानची स्थापना करत तालुक्यातील आपल्या असंख्य युवकांना या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकत्र केले. अडी अडचणी व संकट काळात मदत करत जाणता राजा प्रतिष्ठान हे पारनेर तालुक्यात काम करत आहे. या माध्यमातून तालुक्यात युवकांची मोठी फळी उभी राहिली असून ही उभी करण्यात किरण भाऊ ठुबे यांनी मोठे योगदान दिले आहे. किरणभाऊ ठुबे हे नेहमी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना समाजाला प्रथम स्थान देत असतात.
आपल्या वडिलांचा सामाजिक राजकीय वारसा पुढे चालवताना त्यांनी नेहमी पठार भागावर सामाजिक धोरण ठेवत काम केले आहे. किरणभाऊ ठुबे यांनी जाणता राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे युवकांचे संघटन उभे केले ते खऱ्या अर्थाने तालुक्यात आदर्शवत असे संघटन असून अनेक सहकारी मित्र कोणत्याही संकट काळात सोबत असतात. सामाजिक राजकीय जीवनात काम करत असताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी व्यवसायात सुद्धा मोठी भरारी घेतली आहे. त्यामुळे ते आजच्या युवकांसाठी एक आदर्श आहेत. कार्यकुशल नेतृत्व म्हणून पठार भागावर त्यांच्याकडे पाहिले जाते. तालुक्यातील जिल्ह्यातील व पठार भागावरील अनेक पैलवानांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले असून ते स्वता एक पैलवान असून कान्हूर पठार सारख्या गावात त्यांनी वेळोवेळी कुस्ती स्पर्धा भरविल्या आहेत.
ते पठार भागावर एक युवक नेतृत्व म्हणून समोर येत असून त्यांच्या माध्यमातून आज अनेक दिन दलित गरीब समाजातील लोकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कान्हूर पठार च्या विकासासाठी आमदार निलेश लंके च्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे गावामध्ये आणली आहेत. अशा या समाजप्रिय नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
युवा वर्गातील लोकप्रिय चेहरा..
किरण ठुबे म्हणजे तालुक्यात एक युवा वर्गातील लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखला जातो. युवकांचे संघटन उभे करत असताना मोठा मित्रपरिवार त्यांनी निर्माण केला आहे..
सामाजिक उपक्रम राबवत समाजसेवा..
समाजात काम करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही सामाजिक भावना मनात ठेवून किरण ठुबे हे नेहमी समाजामध्ये सामाजिक उपक्रम राबवत समाजाची सेवा करत आहेत..
संकटकाळात कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन..
कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या सर्व कोरोना सेवकांना सन्मानित करत जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले किरण ठुबे यांनी सर्व कोरोना सेवकांच्या कोरोना काळातील कामाला प्रोत्साहन दिले..
...