नगर - गुलमोहर,पाईपलाईन,तारकपूर,शीला विहार या रस्त्याच्या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मनपाच्या माध्यमातून मोठा विकास निधी ...
नगर - गुलमोहर,पाईपलाईन,तारकपूर,शीला विहार या रस्त्याच्या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मनपाच्या माध्यमातून मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे.शहर विकास कामासाठी निधी आणण्यासाठी खूप कसरत करावी लागते.परंतु मनपाच्या झोपलेले प्रशासन संत गतीने कारभार करत आहे.सदर रस्त्याची कामे मंजूर होऊन जवळपास पाच ते सहा महिने होऊ गेली तरी सदर रस्त्याचे काम सुरू झाले नाही.रस्त्यावरील अतिक्रमणे काढली असून काही ठिकाणी रस्ते खोदून ठेवली आहेत. या खड्ड्यामुळे व उडणारे धुळीमुळे नागरिक त्रस्त झाली आहेत.
याचबरोबर या रस्त्यावरील उद्योग व्यवसाय व्यापारी ही त्रस्त झाली आहे. पाच ते सहा महिन्यांपासून प्रशासनाच्या वेळ काढून पणामुळे व नियोजन अभावी रस्त्याच्या कामाला गती मिळाली नसल्यामुळे सावेडी उपनगरातील नगरसेवकांना नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी आमदार संग्राम जगताप यांनी मनपा प्रशासनाला सूचना देऊनही काम सुरू न केल्यामुळे सावेडी उपनगरातील नगरसेवकांनी आयुक्त कार्यालय येथे ठिय्या आंदोलन सुरू केले. व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी नगरसेवकांनी नगररचना विभाग, बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे रस्त्याची कामे निधी असूनही वेळेवर पूर्ण होत नाही. जोपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत आम्ही नगरसेवक हे आंदोलन मागे घेणार नाही. यावेळी आयुक्त शंकर गोरे यांनी लेखी आश्वासन देत नगरसेवकांना सांगितले की येत्या दोन दिवसात या सर्व रस्त्यांची कामे सुरू होऊन दर्जेदार कामे केली जातील मार्च 2023 पर्यंत सर्व रस्त्याची कामे पूर्ण होतील रुंदीकरणासहित ही कामे केली जाणार आहे. असे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी विरोधी मनपा पक्षनेता संपत बारस्कर, स्थायी समितीचे सभापती कुमार सिंह वाकळे,मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, विनीत पाऊलबुद्धे, तायगा शिंदे,बाळासाहेब पवार, सुनील त्रिंबके,बाळासाहेब बारस्कर,सतीश शिंदे,बापू जानवे, कुमार नवले, उपायुक्त यशवंत डांगे,शहर अभियंता सुरेश इथापे, इंजि. श्रीकांत पारखे आदी उपस्थित होते.
COMMENTS