वासुंद्यात पुन्हा एकदा घुमला भिर्रर्रर्रर्र...चा नाद ! सुजीत झावरे पाटील यांच्याहस्ते बैलगाडा घाटाचे उद्घाटन पारनेर/प्रतिनिधी : बैल हा शेतक...
वासुंद्यात पुन्हा एकदा घुमला भिर्रर्रर्रर्र...चा नाद !
सुजीत झावरे पाटील यांच्याहस्ते बैलगाडा घाटाचे उद्घाटन
पारनेर/प्रतिनिधी :
बैल हा शेतकऱ्याचा राजा असून शेतकऱ्याच्या सुखात दुःखात शेतकऱ्या सोबत असणाऱ्या बैलावर कष्टकरी शेतकरी खऱ्या अर्थाने प्रेम करत असतो बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान आपला राजा घाटात डौलाने पळताना पाहून शेतकऱ्याला जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त न करण्यासारखा असतो. असे मत वासुंदे येथे आयोजित बैलगाडा शर्यती दरम्यान सुजीत झावरे पाटील यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे बिरोबा यात्रा उत्सवा निमित्ताने सुजीत झावरे पाटील मित्र मंडळ व देवकृपा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीचे उद्घाटन पारनेर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बैलगाडा शर्यतीसाठी जुन्नर, आंबेगाव, मंचर, शिरूर, राहुरी, संगमनेर, पारनेर, नगर या भागातून १५० पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात बैलगाडा स्पर्धक उपस्थित होते. या ठिकाणी झालेल्या शर्यती या लक्षवेधी ठरल्या असून स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बैलगाडा शौकीन उपस्थित होते.
या बैलगाडा शर्यती चा उद्घाटन प्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, जिल्हा परिषद सदस्य व दूध संघाचे मा. अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, भाजपा पारनेर शहर अध्यक्ष किरण कोकाटे, बाजार समितीचे मा. सभापती अरुणराव ठाणगे, पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष ऍड. बाबासाहेब खिलारी, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, कडूसचे सरपंच मनोज मुंगसे, प्रगतशील शेतकरी रंगनाथ सैद, उपसरपंच शंकर बर्वे, गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे, ग्रामपंचायत सदस्य विलास साठे सर, युवा नेते रवींद्र पडळकर, ज्येष्ठ नेते निजाम पटेल, युवा नेते सतीश पवार, मा. चेअरमन दिलीप पाटोळे, व्हा चेअरमन बाळासाहेब झावरे, बाळासाहेब पाटील, गजानन झावरे, बापूसाहेब गायखे, अशोक चेमटे सर,
प्रसिद्ध बैलगाडा मालक बाळशिराम पायमोडे, विठ्ठल झावरे, सचिन सैद, तुकाराम झावरे, बंडू जगदाळे, सचिन साठे, इंजि. प्रसाद झावरे, उत्तम तळेकर, सोसायटी संचालक लक्ष्मण झावरे, सुमितभैय्या औटी, दीपक कारखिले, अंकुश बर्वे, विकास झावरे, अभिनव पाटोळे, पै. बाळासाहेब साळुंखे, सचिन उगले, आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान या बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांक ५१ हजार, द्वितीय क्रमांक ४१ हजार, तृतीय क्रमांक ३१ हजार, चतुर्थ क्रमांक २१ हजार, तसेच फळी फोड गाड्या व घाटाचा राजास यावेळी भरघोस बक्षिसे देण्यात आली. दुपारी १२ च्या दरम्यान बैलगाडा शर्यतीच्या घाटामध्ये १० हजारापेक्षा जास्त बैलगाडा प्रेक्षक उपस्थित होते.