किरण ठुबे असू शकतात कान्हूर पठार गटात राष्ट्रवादीचे उमेदवार ! पारनेर प्रतिनिधी : पठार भागावरील युवा चेहरा किरण ठुबे हे राष्ट्रवादीमध्ये आमदा...
किरण ठुबे असू शकतात कान्हूर पठार गटात राष्ट्रवादीचे उमेदवार !
पारनेर प्रतिनिधी :
पठार भागावरील युवा चेहरा किरण ठुबे हे राष्ट्रवादीमध्ये आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळू शकते. पारनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती स्व. लोकनेते रावसाहेब अण्णा ठुबे यांचे किरण ठुबे हे चिरंजीव असून आपल्या वडिलांचा राजकीय सामाजिक वारसा ते नेटाने चालवत आहेत. किरण ठुबे यांनी पठार भागावर काम करताना युवकांचे मोठे संघटन उभे केले असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी व समस्यांसाठी ते काम करत आहेत. आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून काम करताना त्यांनी कान्हूर पठार परिसरामध्ये अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत.
विकासात्मक कामांच्या माध्यमातून सामाजिक कामही त्यांनी उभी केली आहे. युवकांचे त्यांच्या पाठीमागे मोठे संघटन असून आमदार निलेश लंके यांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून ते पठार भागावर ओळखले जातात. जाणता राजा प्रतिष्ठान च्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी संपूर्ण तालुक्यात युवकांचे मोठे संघटन उभे केले असून आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊ शकतो.
कान्हूर पठार जिल्हापरिषद गटावर आझाद ठुबे यांचे वर्चस्व असून त्यांना शह देण्यासाठी आमदार निलेश लंके किरण ठुबे यांच्या रूपाने राजकीय डाव खेळू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून किरण ठुबे यांना आमदार निलेश लंके यांनी कान्हूर पठार जिल्हा परिषद गटांमध्ये उमेदवारी करण्याची संधी दिल्यास सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे एक आक्रमक नेतृत्व पुढे येऊ शकते.
पारनेर तालुक्याचे लोकनेते आमदार निलेश लंके हे सध्या तालुक्यातील अनेक युवकांना पुढे येण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन देत असून किरण ठुबे सारख्या युवकाला जर जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरवले तर प्रस्थापित आझादराव ठुबे यांच्या विरोधात एक तगडे आव्हान नक्कीच उभे राहील.
किरण ठुबे यांचा तळागाळातील जनतेपर्यंत असलेला जनसंपर्क युवकांचे संघटन व माजी आमदार नंदकुमार झावरे, लोकनेते आमदार निलेश लंके, माजी सभापती राहुल भैय्या झावरे यांचे असलेले मोलाचे मार्गदर्शन हे खऱ्या अर्थाने किरण ठुबे यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा किरण ठुबे यांच्या माध्यमातून पठार भागावर फडकू शकतो.