कोरठण खंडोबा देवस्थानच्या वतीने तुषार सहाने यांचा सन्मान पारनेर प्रतिनिधी : महाराष्ट्राचे कुलदैवत सोन्याची जेजुरी मार्तंड देवस्थान जेजुरी गड...
कोरठण खंडोबा देवस्थानच्या वतीने तुषार सहाने यांचा सन्मान
पारनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे कुलदैवत सोन्याची जेजुरी मार्तंड देवस्थान जेजुरी गडाच्या अध्यक्षपदी जुन्नर तालुक्यातील तुषार सहाने यांची निवड झाली. या निवडीचे विविध सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातून स्वागत होत आहे. त्यांचा विविध ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात येत असून पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा देवस्थान चे अध्यक्ष ऍड. पांडुरंग गायकवाड व विश्वस्त किसनराव धुमाळ यांनी त्यांचा कोरठण देवस्थानच्या वतीने व पारनेर तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला.
यावेळी बोलताना कोरठण खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग गायकवाड म्हणाले की तुषार सहाने सारख्या एका युवकाला महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण कुलदैवत असलेल्या मार्तंड देवस्थान जेजुरी गडाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली असून देवस्थानच्या विकासासाठी व देवस्थानचे कार्य समाजापर्यंत पोचविण्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांच्या अध्यक्षपदी निवडीमुळे मी त्यांचे कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्टच्यावतीने अभिनंदन करतो.
यावेळी विश्वस्त अमर गुंजाळ रामदास मुळे हे उपस्थित होते.