वनकुट्याचा आखाडा चित्तथरारक लढतीनी गाजला राज्यभरातून पहिलवानांची हजेरी तालुक्यात राज्यस्तरीय कुस्त्या दरवर्षी भरवणार : आमदार निलेश लंके पार...
वनकुट्याचा आखाडा चित्तथरारक लढतीनी गाजला
राज्यभरातून पहिलवानांची हजेरी
तालुक्यात राज्यस्तरीय कुस्त्या दरवर्षी भरवणार : आमदार निलेश लंके
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील वनकुटे येथे शुक्रवारी पार पडलेल्या आखाडयात चित्तथरारक लढती रंगल्या. आखाडयात शेकडो मल्लांवर लाखो रुपयांच्या इनामांची खैरात करण्यात आली. भारत केसरी माऊली जमदाडे तसेच उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार यांच्यात झालेली विजेतेपदाची लढत बरोबरीत सुटली. आखाडयाचे आयोजन करणारे नीलेश लंके प्रतिष्ठानचे राज्य सचिव तथा वनकुटेचे सरपंच अॅड. राहुल झावरे यांनी ही माहिती दिली. वनकुटे येथे प्रथमच प्रतिमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानाचे अत्यंत नेटक्या पध्दतीने अॅड. राहुल झावरे यांनी नियोजन केले होते.
दुपारी साडेचार वाजता सुरू झालेल्या कुस्त्या रात्री दहा वाजेपर्यंत सुरूच होत्या. जिल्ह्यासह राज्यातील नामवंत मल्लांनी या मैदानात हजेरी लावली. मैदानात हजेरी लावली. मैदानात उपमहाराष्ट्र केसरी विलास डोईफोडे व विष्णू खोसे यांची लढत चुरशीची ठरली. मात्र मल्ल विष्णू जखमी झाल्याने कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. माऊली कोकाटे व समीर देसाई यांच्यात लढत झाली. ही लढत अतिशय चित्तथरारक झाली. माऊली कोकाटे यांने दुहेरी पटावर समीर देसाई याच्यावर मात करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. शिरापूरचे सरपंच हनुमंत भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.
मैदानात राष्ट्रीय कुस्ती पंच बाळासाहेब भालेराव, गुंडा भोसले, अमोल लंके, अर्जुन लामखडे, अनिल ब्राम्हणे, अनिल लोणारे, ऋषी लांडे, अण्णा गायकवाड, सुरेश पालवे, अक्षय पवार, विजय पवार व तालुक्यातील नामवंत मल्लांनी पंच म्हणून काम पाहिले. युवराज तात्या केचे यांनी मैदानाचे सूत्रसंचालन केले. आमदार नीलेश लंके, अर्जुन भालेकर, सूरज हैलकर, राजूशेठ गायकवाड, गोविंद साबळे, अजय लामखडे, शिवाजी होळकर, राजू रोकडे, अप्पासाहेब शिंदे, गणेश हाके, अक्षय चेडे, चंद्रकांत चेडे, शिवाशेठ लंके, अशोक चेडे, अशोक कटारिया, बाळासाहेब खिलारी, भाऊसाहेब डुकरे, सुरेश गागरे, उपसरपंच अर्जुन कुलकर्णी, कारभारी मुसळे, बाळासाहेब रांधवण, बाळू खामकर, नारायण गागरे रामा साळवे, भाऊसाहेब वालझाडे, भिमराज मुसळे, बाळासाहेब बर्डे आदी या वेळी उपस्थित होते.
निलेश लंके प्रतिष्ठान कुस्तीगीर संघाचे होणार स्थापना..
निलेश लंके प्रतिष्ठानचा कुस्तीगीर संघ स्थापन करून दरवर्षी तालुक्यात राज्यस्तरीय दर्जाच्या कुस्ती स्पर्धा पारनेर या ठिकाणी भरवून कुस्ती खेळाला प्रोत्साहन देणार असल्याचे आमदार निलेश लंके वनकुटे येथे झालेल्या राज्यस्तरीय भव्य कुस्ती आखाडा मध्ये बोलताना म्हणाले..