वेब टीम : अमरावती एसटी कामगारांना भडकविण्यात आले आहे. त्यांना चुकीच्या मार्गाला नेण्याचे काम काहीजणांनी केले आहे. त्यामुळेच पुढील दुष्परिणा...
वेब टीम : अमरावती
एसटी कामगारांना भडकविण्यात आले आहे. त्यांना चुकीच्या मार्गाला नेण्याचे काम काहीजणांनी केले आहे.
त्यामुळेच पुढील दुष्परिणाम घडला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी एसटी कर्मचार्यांनी निवासस्थानावर केलेल्या हल्ल्याबाबत आपले मत व्यक्त केले.
दरम्यान या आंदोलनामागे भाजपच असल्याचा दावा पवार यांनी केला.
अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद बैठक मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, एसटी कामगार हा समाजाचा लहान घटक आहे. या सर्वसामान्य एसटी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.
परंतु त्यांना भडकवण्यात आले आणि त्यांना चुकीच्या मार्गाला नेण्यात आल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसून आले. दरम्यान, केंद्रात बसलेल्यांनी ’काश्मीर फाईल्स’ पाहण्याचे आवाहन करावे हे दुर्दैवी आहे, भाजपचे हे काम हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद लावण्याचे आहे, असा आरोपही पवार यांनी केला.