पारनेर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी विकास गिरी पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणार : विकास...
पारनेर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी विकास गिरी
पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणार : विकास गिरी
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील गांजीभोयरे येथील आमदार निलेश लंके यांचे एकनिष्ठ सहकारी विकास गिरी यांची नुकतीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या पारनेर तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली तसे नुकतेच पत्र पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार निलेश लंके यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजेंद्र तात्या फाळके, नगराध्यक्ष विजय औटी, अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे, अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हा संघटक मायाताई रोकडे, मा. सभापती सुदाम पवार, जितेश सरडे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तुषार गाडेकर, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रशांत गोरडे, यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी विकास गिरी यांनी आपल्यावर पक्षाने जी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी आपण आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रीतीने पार पाडू असा विश्वास दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष संघटना वाढीसाठी तालुकास्तरावर काम करणार असून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.