तिखोलच्या सरपंच पदी राष्ट्रवादीच्या रोहिणी संदीप ठाणगे बिनविरोध पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तिखोल ग्रामपंच...
तिखोलच्या सरपंच पदी राष्ट्रवादीच्या रोहिणी संदीप ठाणगे बिनविरोध
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या तिखोल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार निलेश लंके प्रतिष्ठाण व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रोहिणी संदीप ठाणगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मावळते सरपंच अनिल तांबडे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या रोहिणी संदीप ठाणगे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
या निवडीबद्दल आमदार निलेश लंके मा. सभापती सुदाम पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूशेठ शिर्के, पारनेर शहर नगराध्यक्ष विजुभाऊ औटी, अशोक कटारिया, सरपंच ऍड. राहुल झावरे, सरपंच प्रकाश गाजरे, कारभारी पोटघन मेजर, सतीश भालेकर, यांनी अभिनंदन केले.