पठार भागावरील 'किंगमेकर' युवा नेतृत्व सुभाष परांडे गणेश जगदाळे/पारनेर तालुक्याच्या पठार भागावरील अतिशय महत्त्वपूर्ण गाव असलेल्य...
पठार भागावरील 'किंगमेकर' युवा नेतृत्व सुभाष परांडे
गणेश जगदाळे/पारनेर
तालुक्याच्या पठार भागावरील अतिशय महत्त्वपूर्ण गाव असलेल्या वडगाव दर्या येथील सर्वसामान्य कुटुंबातील सामाजिक वारसा असलेले युवा नेतृत्व सुभाष परांडे कौटुंबिक कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वताच्या कर्तुत्वावर गावच्या सामाजिक राजकीय जडणघडणीमध्ये सहभागी होत. वडगाव दर्या गावाला एक विकासाचे व्हिजन त्यांनी दाखवले आहे. पठार भागावर युवक नेतृत्व म्हणून पुढे आलेले सुभाष परांडे हे वडगाव दर्या गावच्या विकासासाठी व आपल्या परिसरातील जनतेच्या प्रश्नांवर व समस्यांवर लढत असून २०२१ साली झालेल्या वडगाव दर्या ग्रामपंचायत निवडणुकीत पठार भागावर सर्वाधिक मताधिक्याने निवडून येत एक कार्यक्षम अपक्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून परिसरामध्ये आपली एक चांगली ओळख निर्माण केली आहे.
तालुका जिल्हा स्तरावरील कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचा हात नसताना स्वकर्तृत्वावर राजकारणात येत आपल्या भोवती राजकीय वलय तयार केले आहे ते प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांना खऱ्या अर्थाने भुवया उंचावायला लावणारे आहे.
पठार भागासारख्या दुष्काळी पट्ट्या मध्ये नेतृत्व करत असताना सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न हाताळण्याची त्यांना संधी मिळाली आहे. युवकांचे आक्रमक नेतृत्व म्हणून पठार भागावर त्यांच्याकडे आता पाहिले जात असून युवकांची मोठी फळी व संघटन त्यांच्या पाठीमागे उभे आहे.
पठार भागावर युवकांसाठी नेहमी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुभाष परांडे करत असतात सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा पठार भागावर भरून क्रिकेट प्रेमींसाठी ते नेहमी वेगळी पर्वणीच देतात व ग्रामीण भागातील खेळाडूंना विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहन देण्याचे काम करत असतात.
कार्यक्षम अपक्ष ग्रामपंचायत सदस्य सुभाष परांडे यांनी समाजामध्ये विविध प्रश्न व समस्या सोडवत असताना सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक विषय मार्गी लावले आहेत.
वडगाव दर्या येथील श्री क्षेत्र दर्याबाई वेल्हाबाई देवस्थानच्या विकासासाठी तसेच परिसरात पर्यटन विकासासाठी नेहमी सुभाष परांडे प्रयत्नशील असतात. जाणता राजा प्रतिष्ठान, भूमिपुत्र शेतकरी संघटना आणि लंके प्रतिष्ठान च्या माध्यमातून काम करत असताना पठार भागावर त्यांनी व्यक्तिगत युवक संघटना बळकट केली आहे.
दरम्यान सुभाष परांडे यांनी कोरोना काळात उल्लेखनीय असं काम केलं असून पठार भागावर त्यांनी रुग्णांना आधार दिला आहे. सामाजिक हित जोपासत रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये स्वखर्चाने त्यांनी पोचवले तसेच लॉकडाउन काळामध्ये परिसरातील ग्रामस्थांना भाजीपाला वाटप, किराणा वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
सुभाष परांडे हे वडगाव दर्या येथील श्रीक्षेत्र दर्याबाई वेल्हाबाई देवस्थान परिसरातील प्राणीमात्रंसाठी खाद्य पुरवठा करत असतात यासाठी ते नेहमी तत्पर असतात. श्रीक्षेत्र दर्याबाई वेल्हाबाई देवस्थानची राज्यात ओळख असून या देवस्थानला 'अ' दर्जा मिळविण्यासाठी सुभाष परांडे हे शासन दरबारी पाठपुरावा करत आहे.
राजकीय कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नसताना पठार भागावर स्टार नेतृत्व म्हणून सुभाष परांडे उदयास आले आहेत. पठार भागावर त्यांच्याकडे किंगमेकर म्हणून पाहिले जात असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सुभाष परांडे यांचा कौल कोणाला यानुसार पठार भागाचे राजकारण या पुढील काळात ठरणार आहे.