मांडवे खुर्द सोसायटीमध्ये चुरशीची तिरंगी लढत निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा गाजणार पारनेर प्रतिनिधी : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणा...
मांडवे खुर्द सोसायटीमध्ये चुरशीची तिरंगी लढत
निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा गाजणार
पारनेर प्रतिनिधी :
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीकरिता जनसेवा शेतकरी विकास पॅनल, ग्रामविकास पॅनल आणि तिसरा गावक्रांती परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत होणार असून अपक्ष गावक्रांती परिवर्तन पॅनलमुळे ही निवडणूक रंगतदार होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून नामदेव काशीनाथ आहेर, बाळासाहेब पांडुरंग औटी, सूर्यभान पंढरीनाथ औटी, गणपत गेणू गगारे, दत्तात्रय नामदेव गागरे, नामदेव बाजीराव गागरे, भाऊसाहेब दामू गागरे, विठ्ठल तुळशीराम गागरे, विलास रावसाहेब गागरे, श्यामकांत गंगाराम गागरे, सुनील जालिंदर गागरे सूर्यभान ठकाजी गागरे, संपत त्रिंबक गागरे, तुकाराम निवृत्ती जाधव, शरद सखाराम जाधव, संजय नामदेव जाधव, राजाराम गणपत हारदे, विठ्ठल सीताराम हारदे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व रावसाहेब शंकर गागरे व देवराम शिवनाथ जाधव हे करत आहे, तर जनसेवा शेतकरी विकास पॅनल नेतृत्व सरपंच सोमनाथ आहेर व पांडुरंग जाधव हे करीत आहे, तर गावक्रांती परिवर्तन पॅनलचे नेतृत्व राजेंद्र गागरे हे करत आहे. एकूण ५१६ सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जनसेवा शेतकरी विकास पॅनल शेतकरी विकास पॅनल यांनी गावातील सभासदांना विश्वासात न घेता गावातील एका पदाधिकारीच्या घरी बैठक घेतल्याने, तसेच अपक्ष उमेदवाराना बैठक न बोलवल्याने सभासदमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे अपक्ष गावक्रांती पॅनलच्या उमेदवारांना विश्वासात न घेता नाते-गोते विचार करण्याचा प्रयत्न झाल्याने घराणेशाहीचा मुद्दा गाजणार आहे.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तिनही पॅनलच्या प्रमुखांनी प्रयत्न केले. परंतु अपक्ष उमेदवारांचा विचार न केल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.