दिलीपराव सहकारातील अष्टपैलु व्यक्तीमत्व : समाधान महाराज शर्मा दिलीपराव ठुबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम पारनेर/प्रतिन...
दिलीपराव सहकारातील अष्टपैलु व्यक्तीमत्व : समाधान महाराज शर्मा
दिलीपराव ठुबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम
पारनेर/प्रतिनिधी (गणेश जगदाळे)
सहकार,सामाजिक,राजकीय
क्षेत्रात दिलीपराव ठुबे यांनी मोलाचे योगदान दिले
अनेक तरूणांना उद्योग व्यवसायात पतसंस्थेच्या
माध्यमातून उभारी दिली. समाजाला काही तरी दिले तरच गर्दी होते. दिलीपराव सहकारातील अष्टपैलु व्यक्तीमत्व होते आसे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.
कान्हुर पठार (ता.पारनेर) येथे कान्हुर पठार पतसंस्थेचे दिवंगत कार्यकारी संचालक दिलीपराव ठुबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित किर्तन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार निलेश लंके,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील,माजी सभापती राहुल झावरे,राहुल शिंदे,जेष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के,सखाराम ठुबे,दादाभाऊ सोनावळे,बा.ठ.झावरे,मारूती रेपाळे,
ए.के.ठुबे,शंकर नगरे,कैलास लोंढे,संस्थेच्या अध्यक्षा सुशिला ठुबे,उपाध्यक्ष पी.के.ठुबे,
कार्यकारी संचालिका नमिता ठुबे,सुभाष नवले,राजेंद्र व्यवहारे,सुहास शेळके,संपत खरमाळे,भोमा ठुबे,किसनराव रासकर,दादाभाऊ नवले,भगवान वाळुंज,रूबी हाॅल रूग्णालयाचे संपत ठाणगे,प्रतिष्ठान चे अध्यक्ष धनंजय ठुबे,अॅड.प्रसाद शेळके,स्वप्नील सोमवंशी,शिवाजी ठुबे,दत्तात्रय ठुबे,बबन व्यवहारे उपस्थित होते.
पुण्यस्मरणानिमित्त रूबी हॉल क्लिनिक व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सौजन्यातुन आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते यामध्ये पठार भागावरील ४३८ रूग्णांनी सहभाग नोंदविला यावेळी प्रसिद्ध भुलतज्ञ डाॅ.बाळासाहेब बांडे,डाॅ.अक्षयदिप झावरे,डाॅ.प्रतिक शिंदे,डाॅ.रेखा झावरे,डाॅ.शिवम वर्मा,डाॅ.सुमित,डाॅ.अमोल डहाळे,
डाॅ.रेखा पाटील,डाॅ.अनुष्का डहाळे, डाॅ.आर.टी.ठुबे,डाॅ.मुकेश ठुबे,डाॅ.महेश ठुबे उपस्थित होते.