वाढदिवस विशेष.... झावरे कुटुंबाशी एकनिष्ठ सहकारी मोहनराव रोकडे पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ सारख्या ग्रामीण भागातून ये...
वाढदिवस विशेष....
झावरे कुटुंबाशी एकनिष्ठ सहकारी मोहनराव रोकडे
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ सारख्या ग्रामीण भागातून येऊन सामाजिक राजकीय क्षेत्रात आपली स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली ते म्हणजे मोहनराव रोकडे होय सामाजिक बांधिलकी जपत समाजात राहून आज काम करत आहेत. स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या सामाजिक राजकीय विचारांचा वारसा घेऊन मोहनराव रोकडे आज काम करत आहेत.
मोहनराव रोकडे यांचे प्राथमिक शिक्षण वडगाव सावताळ सारख्या ग्रामीण भागात झाले तर माध्यमिक शिक्षण श्री. भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेच्या वासुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना आपल्या गावातून २० किलो मीटर अंतरावर असलेल्या टाकळी ढोकेश्वर येथे यावे लागले. सुशिक्षित असलेले सामाजिक नेतृत्व मोहनराव रोकडे यांच्या राजकीय सामाजिक जीवनाची सुरुवात खऱ्या अर्थाने पारनेर तालुक्याचे विकासपुरुष असलेले स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली. समाज व्यवस्थेचे सोबत काम करत असताना समाजात राहून काम करणे हीच मोहनरावाची समाजामध्ये खरी ओळख बनली आहे. कोणतीही कौटुंबीक सामाजिक राजकीय पार्श्वभूमी नसलेले मोहनराव रोकडे स्वर्गीय आमदार दादा'च्या माध्यमातून समाजात काम करू लागले.
दरम्यान १९९२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्व. आमदार वसंतराव दादा सोबत इयत्ता सहावीत असताना सायकलवर प्रचार केला. यातूनच खर्या अर्थाने मोहनराव रोकडे यांना राजकारणाची आवड निर्माण झाली.
पुढे युवा नेते सुजित झावरे पाटील यांचे पंचायत समिती पासून ते आज पर्यंत एकनिष्ठ पणे काम करत आहेत. मोहनराव रोकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारनेर तालुका प्रवक्ते पदावर सलग पंधरा वर्ष काम केले आहे. आपल्या स्वतःच्या वडगाव सावताळ गावच्या विकासामध्ये मोहनराव रोकडे यांचे आजपर्यंत मोठे योगदान राहिलेले आहे. गावच्या विकासासाठी त्यांनी विविध योजना गावात आणल्या आहेत.
गावचा विकास या गोष्टीला त्यांनी खर्या अर्थाने प्राधान्य दिले आहे. वडगाव सावताळ या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना, हनुमान मंदिर, गावातील अनेक हाय मॅक्स अशी अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत.
मोहनराव रोकडे यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत वयाच्या ४४ वर्षापर्यंत साधी एक निवडणूक न लढवता राजकारण समाजकारण करत आहेत. तरीही ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवून आहेत.
मोहनराव रोकडे यांचे महाराष्ट्र राज्यातील अनेक आमदार खासदार व राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत मित्रत्वाचे आणि कौटुंबिक संबंध आहेत.
दरम्यान कोरोनाच्या संकटातही मोहनराव रोकडे यांनी समाजासाठी उत्तम काम केले त्यांचे समाजातून कौतुक होत आहे. विविध संस्थांनी त्यांना करो ना एकदा पुरस्काराने सन्मानित केले आहे.
नेहमी चर्चेत असलेलं नेतृत्व मोहनराव रोकडे हे समाजापुढे एक संयमी शांत समजूतदार असे आदर्शवत व्यक्तिमत्त्व आहे.
मैत्री हे नाते निभावणारे मोहनराव रोकडे यांचा मित्रपरिवार मोठा प्रमाणात असून मित्रांवर त्यांचे जीवापाड प्रेम आहे. मित्रांच्या व सहकाऱ्यांच्या कोणत्याही अडचणीत धावून जाणे त्यांचे प्रश्न व समस्या सोडवणे हाच मोहनराव यांचा खरा दिनक्रम असतो.
रोकडे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे राहून काम करत आहेत. माणुसकी धर्म कसा जपला पाहिजे ही शिकवण मोहनराव रोकडे यांच्या कडून सर्वांनी घेणे गरजेचे आहे. अशा अजातशत्रू असलेल्या नेतृत्वाचा आज वाढदिवस मोहनराव रोकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा. !