सुपा-वाळवणे रस्त्यावर अपघात; एक जण जागीच ठार पारनेर प्रतिनिधी : भरधाव वेगात जाणाऱ्या मालवाहू टेम्पोने मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिल्या...
सुपा-वाळवणे रस्त्यावर अपघात; एक जण जागीच ठार
पारनेर प्रतिनिधी :
भरधाव वेगात जाणाऱ्या मालवाहू टेम्पोने मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सुपा ते वाळवणे रोडवर बुधवारी (दि. ४) रात्री ८.२० च्या सुमारास घडली.
रोहिदास यशवंत थोरात (वय ७०, रा. वाळवणे, ता. पारनेर) असे मयताचे नाव आहे. मयत थोरात हे हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलवर सुप्याहून वाळवणे गावाकडे जात असताना वाळवणेकडून सुप्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोने खिंडीजवळ मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिली. या अपघातात थोरात हे गंभीर जखमी होऊन जागीच मयत
याबाबत सुरेश रावसाहेब थोरात (रा. वाळवणे, ता. पारनेर) यांनी सुपा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी टेम्पो चालक आनंद बाळासाहेब वरकड (रा. देऊळगावसिद्धी, ता. नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.