अळकुटीच्या उपसरपंचपदी आरिफ पटेल यांची निवड पारनेर प्रतिनिधी : तालुक्यातील महत्वाची अळकुटी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आरिफ पटेल यांची बिनविर...
अळकुटीच्या उपसरपंचपदी आरिफ पटेल यांची निवड
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील महत्वाची अळकुटी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आरिफ पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अळकुटीच्या राजकीय इतिहासात प्रथमच अल्पसंख्यांक नेतृत्वास संधी मिळाल्याने सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या अळकुटी ग्रामपंचायातीच्या सत्ता स्थापनेवेळी सरपंच व उपसरपंचपदाच्या सव्वा वर्षांच्या •ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार उपसरपंच शरद घोलप यांनी कालावधी पूर्ण झाल्याने पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेसाठी सरपंच डॉ. कोमल भंडारींच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी आरिफ पटेल यांच्याव्यतिरिक्त सत्ताधारी व विरोधी गटातील एकही अर्ज न आल्याने निवडणूक अधिकारी ग्रामसेवक बाळासाहेब दावभट यांनी उपसरपंचपदी आरिफ पटेल यांची बिनविरोध निवड घोषित केली.
निवडीबद्दल ग्रामस्थांतर्फे तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी भंडारी, पंचायत समिती माजी सदस्य डॉ. भास्कर शिरोळे यांच्या हस्ते पटेल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मावळते उपसरपंच शरद घोलप, बाळासाहेब धोत्रे, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पुंडे, अळकुटी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश शिरोळे, संजय ठुबे, महादू भंडारी, संजय मते, निखिल शिरोळे, शरीफ पटेल, अतुल साखला, मारुती म्हस्कुले, मीराबाई शिरोळे, लता घोलप, सारिका शिरोळे, नूरमोहंमद कुरेशी, निजामुद्दीन मोमीन,
शोषब शेख, शाहीद शेख, कैयूम मोमीन, अशोक शिरोळे, संदीप भंडारी, आनंद शिरोळे, संपत परंडवाल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
आरिफ पटेल म्हणाले, माझ्यावर जो विश्वास टाकला, ज्येष्ठ व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने विकासात्मक कामात, सर्वांगीण विकासात सर्वांनाबरोबर घेवून काम करू. उपसरपंचपदाच्या निवडीनंतर आता सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार या विषयी ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे.