डॉ. नितीन रांधवण यांच्या वाढदिवसानिमित्त आज वृक्ष वाटप वाढदिवसानिमित्त वनकुटे येथे राबवणार सामाजिक उपक्रम पारनेर प्रतिनिधी : वनकुटे परिसरात...
डॉ. नितीन रांधवण यांच्या वाढदिवसानिमित्त आज वृक्ष वाटप
वाढदिवसानिमित्त वनकुटे येथे राबवणार सामाजिक उपक्रम
पारनेर प्रतिनिधी :
वनकुटे परिसरातील आदिवासींसाठी देवदूत असलेले वनकुटे गावचे सामाजिक कार्यकर्ते कोविड योद्धा डॉ. नितीन रांधवण यांचा आज शनिवार दि.२८ रोजी जन्मदिवस आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक दायित्व म्हणून डॉ. रांधवण हे समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक उपक्रम राबवत आहेत डॉ. नितीन रांधवण यांच्या वाढदिवसानिमित्त वनकुटे वनकुटे परिसरात विविध सामाजिक उपक्रम आज साजरे करण्यात येणार आहेत.
डॉ. नितीन रांधवण मित्र परिवार व युवा नेते दीपक दादा गुंजाळ मित्रपरिवार यांच्या वतीने वनकुटे ग्रामपंचायत समोर वनकुटे परिसरातील ग्रामस्थांना वाढदिवसानिमित्त वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून खऱ्या अर्थाने समाज आला फायदा होईल असा उपक्रम घेऊन डॉक्टर नितीन रांधवण यांनी चांगला सामाजिक संदेश दिला आहे. वृक्ष वाटप कार्यक्रमासाठी पारनेर तालुक्यातील विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे डॉ. नितीन रांधवण, युवा नेते दीपक दादा गुंजाळ, ऋषिदादा गागरे, सचिन गागरे, यांनी माहिती दिली.
सामाजिक बांधिलकी जपत आता समाजामध्ये वाढदिवस साजरे केले जात नाही परंतु डॉ. नितीन रांधवण यांनी खऱ्या अर्थाने वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे डॉ. रांधवण यांचा वाढदिवस तालुक्यात व समाजामध्ये खऱ्या अर्थाने एक आदर्शवत वाढदिवस ठरावा या हेतूपरस्पर हा वृक्ष वाटपाचा कार्यक्रम आम्ही वनकुटे येथे करत असल्याचे वनकुटे येथील युवा नेते दीपकदादा गुंजाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.