कंटेनरची रिक्षाला धडक; सहा जागीच ठार कोपरगाव तालुक्यातील घटना कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात कंटेनरने रिक्षाला ...
कंटेनरची रिक्षाला धडक; सहा जागीच ठार
कोपरगाव तालुक्यातील घटना
कोपरगाव प्रतिनिधी :
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात कंटेनरने रिक्षाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले.
मुंबई-नागपूर महामार्गावर आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान कंटेरनरने समोरुन येणाऱ्या दुचाकीला कट मारुन प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोराची दिली. यामुळे रिक्षामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षातील प्रवाशांसह मोटारसायकलवरील तिघे असे सात जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा समावेश आहे.
या अपघात राजाबाई साहेबराव खरात (वय ६०, रा. चांदेकसारे), आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय ६५, रा. वावी), पूजा नानासाहेब गायकवाड (वय २०, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (वय २० रा. चांदेकसारे) शैला शिवाजी खरात (वय ४२, रा. श्रीरामपूर), शिवाजी मारुती खरात (वय ५२, रा. श्रीरामपूर) यांचा मृत्यू झाला.
विलास साहेबराव खरात (वय ३४, रा. चांदेकसारे), कावेरी विलास खरात (वय ५, रा चांदेकसारे), रुपाली सागर राठोड (वय ४०, रा. सिन्नर), धृव सागर राठोड (वय १७, रा.सिन्नर) यांच्यासह दुचाकीवरील दिगंबर चौधरी आणि त्यांचा मुलगा सर्वेश (वय १२) व बहिण कृष्णाबाई गोविंद चौधरी (वय ४२) सर्व रा. पोहेगाव हे जखमी आहेत.
अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग (वय ४२, रा. दानामंडी, लुधियाना पंजाब) हा नाशिकच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. माञ, स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.