एक निष्ठतेचे फळ मिळाले : युवा नेते संदीप ठाणगे राष्ट्रवादीचे युवानेते संदीप ठाणगे यांच्या पत्नी तिखोलच्या सरपंच पदी तिखोल गावचा चेहरा-मोहरा ...
एक निष्ठतेचे फळ मिळाले : युवा नेते संदीप ठाणगे
राष्ट्रवादीचे युवानेते संदीप ठाणगे यांच्या पत्नी तिखोलच्या सरपंच पदी
तिखोल गावचा चेहरा-मोहरा बदलणार
आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून गावचा विकास करणार
संदीप ठाणगे यांनी सरपंच पदी पत्नीची निवड झाल्यानंतर व्यक्त केले मत
ठाणगे यांनी निवडीनंतर तिखोल ग्रामस्थांचे मानले आभार
पारनेर प्रतिनिधी :
तिखोल गावच्या सरपंच पदी सौ.रोहिणी संदिप ठाणगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
त्या लोकनेते आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक निलेश लंके प्रतिष्ठान टाकळी ढोकेश्वर गणाचे अध्यक्ष संदिप ठाणगे यांच्या पत्नी आहेत.
संदीप ठाणगे हे आमदार निलेश लंके यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून तालुक्यामध्ये काम करतात
युवा नेते संदीप ठाणगे यांची आमदार निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी म्हणून संपूर्ण पारनेर तालुक्यात ओळख तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुख निलेश लंके यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर तेव्हापासून संदीप ठाणगे हे त्यांच्यासोबत काम करत आहे.
ठाणगे यांचे टाकळी ढोकेश्वर गणांमध्ये व तिखोलच्या आजूबाजूच्या गावांमध्ये युवकांचे उत्तम संघटन आहे युवकांची मोठी फळी कार्यरत असून आमदार निलेश लंके यांच्या पाठीमागे मोठी ताकद उभी केली आहे.
एक वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुक त्यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून निवडणुकीत विजय संपादन केला.
त्यावेळेपासूनच त्यांच्या पत्नी सरपंचपदाचा प्रमुख दावेदार मानल्या जात होत्या पण संघटना एकसंघ व्हावी व वाढावी या उदात्त हेतूने त्यांनी त्यांचे मित्र अनिल तांबडे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ घातली. माजी सरपंच तांबडे यांनी आपल्या मित्राचा विश्वास सार्थ ठरवत संदीप ठाणगे यांना संधी मिळावी म्हणून एक वर्षानंतर सरपंच पदाचा राजीनामा दिला. आता राजीनामा दिल्यानंतर संदीप ठाणगे यांच्या पत्नी रोहिणी ठाणगे या तिखोल गावच्या बिनविरोध सरपंच झाल्या आहेत.
अनिल तांबडे व संदीप ठाणगे यांच्या मैत्रीची व एकनिष्ठतेवहा आता तालुक्यात चर्चा. होत आहे या जोडगोळीने तिखोल ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध सरपंच बसविल्यामुळे निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढली आहे. तिखोल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच अनिल तांबडे, ग्रामपंचायत सदस्य चांद इनामदार, संदीप कावरे, भाऊसाहेब ठाणगे, दत्ता ठाणगे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गणेश भाऊसाहेब ठाणगे तंटा मुक्तीचे अध्यक्ष सुनिल विष्णु ठाणगे,
निलेश लंके प्रतिष्ठान चे मार्गदर्शक शिवाजी विष्णु ठाणगे, रावसाहेब नाना ठाणगे, पोपट राघु ठाणगे, संजय वाघ, ठकाजी ठाणगे, भानुदास शेटे, आबासाहेब दातीर, सुभाष दातिर, शिवाजी ठाणगे गुरुजी, संजय दोरगे, अनिल धोंडीबा ठाणगे अंबादास नामदेव ठाणगे, दत्तात्रय नाना ठाणगे, प्रभाकर मंचरे, उत्तम तुकाराम ठाणगे, किसन ठाणगे, योगेश ठाणगे मेजर, अमोल साळवे, संजय ठाणगे मेजर, भानुदास पंढरीनाथ ठाणगे, सतीश शेंडगे, भगवंत मंचरे ,संतोष मंचरे, दिनकर कुटे बाळासाहेब नन्नवरे, दादा दशरथ ठाणगे भानुदास हरी ठाणगे, सुनिल नामदेव ठाणगे, आदी तिखोल येथील ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
आमदार निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिखोल गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून गावाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन. निलेश लंके प्रतिष्ठान चे टाकळीढोकेश्वर गटाचे अध्यक्ष युवा नेते संदीप ठाणगे यांनी मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
तिखोल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रोहिणी ठाणगे यांच्या निवडीबद्दल आमदार निलेश लंके, माजी सभापती सुदाम पवार, तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूशेठ शिर्के, म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व उद्योजक अशोक कटारिया, सरपंच ऍड. राहुल झावरे, कारभारी पोटघन मेजर, सतीश भालेकर यांनी अभिनंदन केले.