सुप्यात मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद पोलिसांची बेधडक कारवाई पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील सुपा पोलिस स्टेशन हद्दीतील सुपा औद्योगीक वसा...
सुप्यात मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद
पोलिसांची बेधडक कारवाई
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सुपा पोलिस स्टेशन हद्दीतील सुपा औद्योगीक वसाहत परीसरात कामगारांच्या मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. याबाबत दि. १९ रोजी गोरक्षनाथ संजय चव्हाण यांनी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की,
एमआयडीसी परीसरात नंबर प्लेटवर तेजू अक्षरे असलेल्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटार सायकलवरून आलेल्या दोन इसमांनी मोबाईल चोरून नेला आहे. सदर फिर्यादीवरून पोलिसानी गुन्हा दाखल केला.सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत अपर पोलिस अधिक्षक यांचे सूचनेनुसार पो.स्टे हद्दीत गस्त व नाकाबंदी करण्यात येत होती. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एमआयडीसी परीसरात वरील वर्णनाच्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडरवर दोन इसम संशयीतरीत्या फिरत आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाण गाठले व त्यांना ताब्यात घेतले. नाव, गाव याबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे अभिषेक रावसाहेब नरसाळे (वय २०), तेजस रमेश निमोणकर (वय १८ रा. जवळा, ता. पारनेर) असे सांगितले. त्यांचेकडे चोरी
केलेल्या मोबाईलबाबत विचारपूस केली असता सुपा एमआयडीसी परीसरातून मोबाईल चोरी केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून १० हजार ५०० रुपये किंमतीचा इनफिनिक्स कंपनीचा, ८ हजार रुपयांचा होनोर कंपनीचा, १० हजार रुपयांचा व्हीवो कंपनीचा १० हजार रुपयांचा ओपो कंपनीचा असे मोबाईल्स व ५० हजार किमतीची स्प्लेंडर मोटार सायकल असा ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, उपनिरीक्षक पवार, हे.कॉ. ओहोळ, पोना. ठोंबरे, पोना. लगड, पोकॉ. मुसळे यांनी केली आहे.