वाढदिवस विशेष... समाजहित जपणारे व्यक्तिमत्व कोव्हिड योद्धा डॉ. नितीन रांधवण आदिवासींचे खरे देवदूत; समाजशील व्यक्तिमत्व कोव्हिड योद्धा डॉ. नि...
वाढदिवस विशेष...
समाजहित जपणारे व्यक्तिमत्व कोव्हिड योद्धा डॉ. नितीन रांधवण
आदिवासींचे खरे देवदूत; समाजशील व्यक्तिमत्व
कोव्हिड योद्धा डॉ. नितीन रांधवण
गणेश जगदाळे/पारनेर
डॉ. नितीन रांधवण शांत, संयमी, तितकेच शिस्तप्रिय असलेलं व्यक्तिमत्व वनकुटे सारख्या ग्रामीण भागांमध्ये जनसामान्यांची सेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभलं आदिवासी ग्रामीण भागामध्ये आरोग्य सुविधा कशा पुरवता येतील या हेतूने वनकुटे येथे स्वतःचे हॉस्पिटल सुरू करून त्या माध्यमातून आरोग्य सेवा सर्वसामान्य घटकातील व आदिवासी समाजातील जनतेपर्यंत पोहोचविली.
वनकुटे परिसर तसा पारनेर तालुक्यात आदिवासी पट्टा म्हणून ओळखला जातो या परिसरात सेवा सुविधा कमी प्रमाणात दळणवळणाची सेवा हि कमी अशा भागांमध्ये आरोग्य सेवेचे काम डॉ. नितीन रांधवण यांनी सुरु केले. अतिशय अडचणींचा सामना त्यांना करावा लागला परंतु आपल्या भागातील जनतेची सेवा करायची ही मनाशी खूणगाठ त्यांनी बांधली त्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांतील ठाकर, धनगर भिल्ल, दलित या सर्वसामान्य जनतेला आपल्या गावातच आरोग्याच्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या भागातील जनतेसाठी खऱ्या अर्थाने डॉ. नितीन रांधवण हे देवदूत बनले आहे. सामाजिक कामाचा वारसा घेऊन ते करत असलेली सेवा कार्य हे निश्चितच उल्लेखनीय आहे.
वनकुटे येथे सामाजिक कार्यामध्ये ही रांधवण कुटुंबाचा व डॉ. नितीन रांधवण यांचा नेहमीच सहभाग असतो अध्यात्मिक धार्मिक कार्यातही ते नेहमी अग्रभागी असतात.
वनकुटे परिसरातील व गावातील विविध समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी काम करत आहेत. त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला डॉ. नितीन रांधवण हे नेहमी हवेहवेसे वाटतात
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील पळशी वनकुटे तास खडकवाडी गाजीपुर वडगाव सावताळ ढवळपुरी या भागात खऱ्या अर्थाने आदिवासी समाज जास्त प्रमाणात असल्याने या समाजाच्या समस्या सोडवताना डॉ. नितीन रांधवण नेहमी सांगतात की गरीब कुटुंबाचे प्रश्न सोडविल्या नंतर त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर जो आनंद निर्माण होतो तो आपण शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही सामाजिक भावना मनात ठेवूनच मी काम करत आहे.
डॉ. नितीन रांधवण यांचे समाजातील प्रत्येक घटकाशी असलेली नाळ ही घट्ट असून या भागात त्यांची सुरू असलेले कार्य समाजाला नवी उमेद देत आहे.
दरम्यान डॉ. नितीन रांधवण यांनी कोविड काळामध्ये आपल्या परिसरातील अनेक लोकांना आधार दिला आहे. त्या लोकांसाठी ते खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आहेत आपल्या भागातील दोनशे ते तीनशे कुटुंबांना त्यांनी यांनी कोरोना काळामध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली मदत ही त्यांची खरी पुण्याई आहे.
सामाजिक हित जोपासत राजकीय क्षेत्रांमध्ये ही डॉक्टर सक्रिय असून लोकांच्या सुखदुःखात सहभागी असतात राजकारण करत असताना कोणत्याही प्रकारे व्यक्तिगत पातळीवर ते राजकारण करत नाहीत सामाजिक दृष्टिकोन ठेवून त्यांचे कार्य सुरू असते.
समाजमन जपत डॉ. नितीन रांधवण यांनी मोठा मित्रपरिवार जमवला आहे. त्या मित्र परिवाराचा त्यांना नेहमी आधार वाटतो.
वनकुटे परिसरामध्ये डॉ. नितीन रांधवण यांची मोठे राजकीय युवक संघटना असून त्या माध्यमातून त्यांनी समाज उपयोगी अनेक कामे मार्गी लावली आहेत. वनकुटे गावच्या सामाजिक विकासामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो डॉ. नितीन रांधवण हे आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांना आपले राजकीय दैवत मानतात. डॉ. रांधवण यांच्या यापुढील राजकीय सामाजिक वाटचालीस त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा... त्यांचे सामाजिक राजकीय कार्य असेच बहरत जावो..
...