हनुमान भक्तीने मन प्रसन्न होते : स्वप्नील झावरे पाटील श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्था परिवाराच्या वतीने वासुंदे येथे महाआरती पारनेर प्रति...
हनुमान भक्तीने मन प्रसन्न होते : स्वप्नील झावरे पाटील
श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्था परिवाराच्या वतीने वासुंदे येथे महाआरती
पारनेर प्रतिनिधी :
वासुंदे गावचे ग्रामदैवत दक्षिण मुखी हनुमान मंदिरात नित्यनेमाने दर शनिवारी महाआरती होत असते आज दि.२८ मे या दिवशीच्या महाआरती युवा नेते व श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे संचालक स्वप्नील झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली.
स्वप्नील झावरे हे वासुंदे गावच्या सामाजिक अध्यात्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात, श्री गुरुदत्त परिवाराच्या वतीने नेहमीच वासुंदे गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.
यावेळी बोलताना ते म्हणाले की ग्रामदैवत हनुमंतरायाची पूजा व भक्ती केल्याने मन प्रसन्न होते शांती सद्भावना निर्माण होते व प्रत्येक भाविकाला दर्शनाने दररोज नविन ऊर्जा प्राप्त होते. दक्षिण मुखी असलेले हनुमंतराया जागृत देवस्थान असून गावातील प्रत्येक ग्रामस्थ दररोज सकाळी नित्यनेमाने दर्शन घेत असतात.
यापुढील काळात वासुंदे गावच्या अध्यात्मिक ,सामाजिक कामांमध्ये ग्रामस्थांच्या बरोबर मी सक्रिय राहून गावच्या विकासास हातभार लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
यावेळी वासुंदे येथिल जेष्ठ मंडळी, युवकवर्ग,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.