गुरुच्या प्रति आदरभाव जपा - डॉ . ठुबे . ४३ वर्षानंतर मित्रपरिवार आला एकत्र ... ज्ञान मंदिराला भरिव आर्थिक मदत हे देण्याचे केले नियोजन पारने...
गुरुच्या प्रति आदरभाव जपा - डॉ . ठुबे .
४३ वर्षानंतर मित्रपरिवार आला एकत्र ...
ज्ञान मंदिराला भरिव आर्थिक मदत हे देण्याचे केले नियोजन
पारनेर / प्रतिनिधी (संजय मोरे)
आई वडिलांच्यानंतर माणसाचे जीवनात संस्कार घडविण्याचे काम गुरुजना कडुन होत असते माणुस घडविण्यात गुरूंचे मोठे योगदान आहे म्हणुन जिवणामध्ये आईवडिलां इतकाच गुरू प्रति आदरभाव जपा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सडक योजनेचे मुख्य सचिव डॉ. दत्तात्र्य ठुबे यानी केले .
पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्यामंदिर या शाळेतील १९७९ च्या १०वीच्या विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा तब्बल ४३ वर्षानी नवलेवाडी येथील रेनबो फार्म हाऊसवर साजरा झाला त्या प्रसंगी मित्रांसोबत वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते . तात्कालिन शिक्षक एस. के. ठुबे , बी.के. पुरी , टि .ए . जगताप सर या शिकविणाऱ्या शिक्षकांचाही गौरव करण्यात आला .
डॉ. ठुबे पुढे बोलताना म्हणाले की तात्कालिन शैक्षणिक पध्दती आणि आताची पध्दती यात फार मोठी तफावत आसुन आताच्या पिढीने ते बदल स्विकारलेत असे असले तरी शाळेचे नाव काढताच शालेय जीवनातील कडु गोड आठवणिने मन भरून येते यावेळी इयत्ता १० वी ते मुख्यमंत्री सडक योजनेचा मुख्य सचिव या दरम्यानचा जीवनपट उलगडला .
यावेळी १०वी च्या बॅचला शिकविणारे शिक्षक एस .के. ठुबे म्हणाले की आम्ही आद्यापण करत आसताना विद्यार्थ्या प्रति एकनिष्ठ होऊन काम करतो आणि त्याच फळ म्हणजे आपला विधार्थी राज्याच्या आती उच्च पदावर काम करतो याच मोठे समाधान वाटते .
सखाराम भागवत सखाराम गुंजाळ आणि अजित साळवे यांच्या संकल्पनेतुन तयार झालेल्या व्हॉटस अप ग्रुपने सर्वांची भेट घडवुन आणली
यावेळी उपस्थित मित्र मैत्रिणीनी आपल्या शालेय जिवनापासुन ते आज पर्यन्तचे अनुभव कथन केले हास्य विनोद काव्य याच्या माध्यमातुन हा स्नेहमेळावा चांगलाच आनंद देऊन गेला आशी प्रतिक्रीया उपस्थितांनी दिली .
कार्यक्रमाचा उद्देश अजित साळवे यानी प्रस्ताविकात मांडला .
तर सखाराम भागवत यांनी आभार मानले .
कोरोना कालावधी दिवंगत झालेल्या मित्रांना आदरांजली अर्पण करण्यात आली .