दैठणे गुंजाळ मधील अवैध दारू बंद करा; सरपंच बंटी गुंजाळ यांचे पारनेर पोलीस ठाण्यास निवेदन पारनेर प्रतिनिधी : दैठणे गुंजाळ(ता.पारनेर) येथील...
दैठणे गुंजाळ मधील अवैध दारू बंद करा; सरपंच बंटी गुंजाळ यांचे पारनेर पोलीस ठाण्यास निवेदन
पारनेर प्रतिनिधी :
दैठणे गुंजाळ(ता.पारनेर) येथील परीसरात अवैध दारू विक्री व्यवसाय सुरू असुन तो त्वरीत बंद करावा अन्यथा महिलासंह पारनेर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहे आसे निवेदन सरपंच पांडुरंग उर्फ बंटी गुंजाळ यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना दिले आहे.
पत्रकारांशी बोलताना गुंजाळ म्हणाले,गावामध्ये
देशी दारूची खुलेआम विक्री केली जात आहे. दारूविक्रीमुळे लहान मुले तसेच तरुण दारूच्या आहारी जात आहेत, शिवाय गावात भांडण, तंट्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे गावात शांतता भंग हाेत असून, नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.
पारनेर पोलीसांनी वेळोवेळी कारवाई देखील गावामध्ये केल्या आहेत मात्र दोन दिवस हा व्यवसाय बंद होतो पुन्हा सुरू होतो याबाबत गावातील नागरिक देखील या व्यवसायिकांना घाबरून आहेत.
परिसरात देशी दारूची अवैधरित्या राजरोसपणे विक्री केली जात आहे. दारू कोठेही सहज मिळत असल्याने तरुणवर्ग व्यसनाधीन झाला आहे. दारू पिऊन अनेकजण सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असून,सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
अवैध दारू विक्री ची माहीती मिळाल्यानंतर त्या गावामध्ये पोलीस पथक जाऊन त्वरीत कारवाई करते.अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी नागरीकांचा देखील सक्रीय सहभाग महत्वाचा आहे.दैठेणे गुंजाळ येथील अवैध दारूविक्री व्यवसायिकांवर आजपर्यंत आठ वेळा कारवाई केली आहे.कारवाई झाल्यानंतर साक्ष देण्यासाठी देखील नागरीक पुढे येत नाहीत.
घनश्याम बळप
(पोलीस निरीक्षक,पारनेर)