मांडवे खु. विविध विकास सोसायटी वर राष्ट्रवादीचा झेंडा.. युवा सरपंच सोमनाथ आहेर यांचा करिष्मा पारनेर/प्रतिनिधी : संपूर्ण पारनेर तालुक्याचे ल...
मांडवे खु. विविध विकास सोसायटी वर राष्ट्रवादीचा झेंडा..
युवा सरपंच सोमनाथ आहेर यांचा करिष्मा
पारनेर/प्रतिनिधी :
संपूर्ण पारनेर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मांडवे खु. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा शेतकरी ग्रामविकास पॅनेलने विरोधी पॅनेलचा धुव्वा उडवत ९-३ जागांवर आपल्या पॅनलचे वर्चस्व राखले आहे. मांडवे खु. विकास सोसायटी वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली व मांडवे गावचे युवा सरपंच सोमनाथ आहेर, पांडुरंग जाधव व यशवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल विजयी झाला. असून गावातील सर्व घटकांना बरोबरीने घेऊन यांनी ही निवडणूक यशस्वी करून विरोधकांचा धुव्वा उडविला. ९ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजयी संपादन केल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
या निवडणुकीत नामदेव आहेर, शामकांत गागरे, भाऊसाहेब गागरे, नामदेव गागरे, तुकाराम जाधव, शरद जाधव, संजय जाधव हे उमेदवार सर्वसाधारण कर्जदार मधून प्रचंड बहुमतानी विजयी झाले. तसेच मंदाकिनी गागरे, संतोष बागुल यांची बिनविरोध निवड झाली. या सर्व विजयी उमेदवारांच आ. निलेश लंके यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
तसेच विरोधी शेतकरी विकास पॅनलचे गणपत गागरे, दिनकर जाधव हे विजयी झाले, मीना जाधव यांची बिनविरोध निवड झाली. श्रीरंग गागरे, दिनकर दादा जाधव, उपसरपंच राहूल जाधव, गौतम बागुल, पोपटराव गागरे, विनायक जाधव, संपतराव गागरे, संपतराव मेजर जाधव, बाबाजी औटी, भाऊसाहेब गागरे, ज्ञानदेव आहेर, सागर पवार, विठ्ठल जाधव, बाळासाहेब सिताराम जाधव, बाबाजी औटी, किसन पहिलवान, बाळासाहेब किसन जाधव गुरूजी, तुकाराम गागरे गुरुजी, रेवण गागरे, सुधीर जाधव, कैलास गागरे, राजु गागरे, प्रशांत गागरे, कृष्णराव गागरे, किसन हारदे, भाऊसाहेब बिडकर, भीमाशंकर हाडोळे, पोपट जाधव सर, आण्णा औटी, सचिन औटी, रामदास औटी, श्रीकांत गागरे, साहेबराव गागरे यांनी पॅनेलचे मार्गदर्शन केले.