प्रगत विद्यालय वनकुटे 96% निकाल; कु. प्रतीक्षा मुसळे प्रथम क्रमांक पारनेर प्रतिनिधी : नुकताच इ १० वीचा निकाल जाहीर करण्यात झाला. यामध्ये ग्...
प्रगत विद्यालय वनकुटे 96% निकाल; कु. प्रतीक्षा मुसळे प्रथम क्रमांक
पारनेर प्रतिनिधी :
नुकताच इ १० वीचा निकाल जाहीर करण्यात झाला. यामध्ये ग्रामीण भागातील प्रगत विद्यालय वनकुटे या शाळेचा निकाल 96.77 % लागलाअसून.
कोरोना महामारीनंतर तब्बल ३ वर्षाने बोर्ड परिक्षा घेण्यात आली होती.
या ठिकाणी अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत विद्यार्थ्यांना ही परिक्षा द्यावी लागला.
काही कालावधी अभ्यासक्रम हा आँनलाईन पद्धतीने तर काही कालावधीत आँफलाईन पद्धतीने घेण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेसंदर्भात एक संभ्रमावस्था निर्माण झाली होती. तर पण धैर्य आणि चिकाटीने विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली आणि चांगले गुण मिळवले.
पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील प्रगत विद्यालयाचा निकाल समाधान कारक चांगला लागला आहे.
त्यामध्ये प्रगत विद्यालय वनकुटे येथील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कु. प्रतिक्षा शशिकांत 91% टक्के
द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थी कु. निकिता बाबाजी गागरे 90% टक्के
तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थी सोनाली अशोक पायमोडे 86.40% टक्के
या बोर्ड परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सुजितराव झावरे पाटील, सचिव सुदेशभैय्या झावरे पाटील, जि.प.सदस्या सुप्रियाताई झावरे पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पवार सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व वनकुटे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.