वेब टीम : मुंबई केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मंकीपॉक्स आजाराच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आ...
वेब टीम : मुंबई
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मंकीपॉक्स आजाराच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चाचणीसाठीचे सर्व नमुने पुण्यातल्या आयसीएमआरच्या राष्ट्रीय विष्णुशास्त्र संस्थेकडे पाठवण्यात यावेत, असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे.
देशात आतापर्यंत या आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मानवी संसर्गाची जोखीम कमी करण्यासाठी देखरेख आणि जलद निदानावर भर देण्यात आला आहे.
मार्गदर्शक सूचनांनुसार संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या २१ दिवसांच्या कालावधीत संपर्कात आलेल्या व्यक्तींवर देखरेख ठेवणं आवश्यक आहे.
संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श टाळावा आणि विलगीकरण यावर सूचनांमध्ये भर दिला आहे.
COMMENTS