वनकुटे सेवा सोसायटीत आमदार लंके गट १३/० ने पराभूत सरपंच ऍड. राहुल झावरे गटाला करावा लागला पराभवाचा सामना डॉ. नितीन रांधवण ठरले वनकुटे सेवा स...
वनकुटे सेवा सोसायटीत आमदार लंके गट १३/० ने पराभूत
सरपंच ऍड. राहुल झावरे गटाला करावा लागला पराभवाचा सामना
डॉ. नितीन रांधवण ठरले वनकुटे सेवा सोसायटीत किंगमेकर
आगामी ढवळपुरी जिल्हा परिषद गट व गणाचे राजकीय चित्र बदलवणारा निकाल
पारनेर प्रतिनिधी :
वनकुटे सेवा सोसायटी चा निकाल अखेर धक्कादायक लागला असून या सेवा सोसायटी मध्ये आमदार लंके गटाचा १३/० ने पराभव झाला आहे. आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाणारे वनकुटे गावचे सरपंच निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव ऍड राहुल झावरे पाटील यांना सेवा सोसायटीमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वनकुटे सेवा सोसायटीमध्ये डॉ. नितीन रांधवण गटाने एक हात्ती सत्ता मिळवत वनकुटे सेवा सोसायटी ताब्यात घेतली आहे.
या निवडणुकीत आमदार निलेश लंके प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरपंच ऍड. राहुल झावरे पाटील गटाच्या ग्रामदैवत चरपटीनाथ महाराज परिवर्तन पॅनलचा सर्वसामान्यांच्या श्री चरपटीनाथ ग्रामविकास सहकार पॅनलने धक्कादायक १३/० ने पराभव केला.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे कर्जदार मतदार संघ :
औटी कौशिक भगवंता, काळनर विठ्ठल पंढरीनाथ, केसकर भिवा नामदेव, गागरे अशोक जगन्नाथ, गागरे ज्ञानेश्वर बबन, गोरे सोनबा देवराम, पठारे मच्छिंद्र गंगाधर, मुसळे गणेश विलास
अनुसूचित जाती जमाती मतदार संघ :
खामकर मच्छिंद्र रामभाऊ
महिला राखीव मतदार संघ
गागरे ताराबाई भानुदास
वाबळे लक्ष्मीबाई पारुनाथ
इतर मागासवर्गीय मतदार संघ
औटी सुर्यभान कान्हू
भटक्या-विमुक्त मतदार संघ
बुचुडे काशिनाथ किसन
या विजयाने डॉ. नितीन रांधवण यांनी निलेश लंके यांचे खंदे समर्थक असलेल्या सरपंच राहुल झावरे यांना सोसायटी निवडणुकीतच धूळ चारली आहे त्यामुळे ढवळपुरी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये यापुढील आगामी निवडणुकांमध्ये राजकीय चित्र बदलणार असून इच्छुक असलेल्या राहुल झावरे यांचा हा सोसायटी मध्ये झालेला मानहानीकारक पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे.
सरपंच ऍड राहुल झावरे गटाचा पराभव करण्यासाठी बाबाजी गागरे, भानुदास गागरे, पवन खामकर, ज्ञानेश्वर वालझाडे, दीपक गुंजाळ, ऋषी गागरे, कुशाबापु औटी, गणपत काळणर, भास्कर शिंदे, भाऊसाहेब काळणर, पारुनाथ वाबळे, गुलाब गागरे, बाबाजी मुसळे, भीमराज गांगड, शिवराम मधे, ऋषि वाबळे, साहेबराव डुकरे, बाबाजी डुकरे, नंदू पठारे, विजय गुंजाळ, ठाकजी काळणर, आबा मुसळे, रेवन लोणकर, नितीन औटी, संतोष केदारी, सुरेश डुकरे, कारभारी खामकर, रावसाहेब खामकर, संजय गागरे, साहेबराव गागरे, बाळू गागरे, निलेश औटी या बरोबरच इतर सर्व सहकार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दहशतवाद मतदारांनी मोडीत काढला
वनकुटे सेवा सोसायटी मध्ये आमदार लंके गटाचा १३/० ने मानहानीकारक पराभव झाला ही सेवा सोसायटी डॉ. नितीन रांधवण यांच्या गटाकडे गेली आहे. ते या निवडणुकीत किंगमेकर ठरले आहेत. प्रचंड दहशतीखाली ही निवडणूक पार पडली गेल्या आठवड्यात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या ऑडिओ क्लिप मुळे या निवडणुकीवर निश्चित परिणाम झाल्याचे दिसून आले असून त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनी धक्कादायक निकाल आपल्या मतदानातून नोंदविला आहे. या निवडणुकीमध्ये 92 मतदार हेेेे बोगस सोसायटीला सभासद म्हणून करण्यात आले होते. त्या 92 मतदारान विरोधात कारवाईसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली हा विषय न्यायप्रविष्ट आहे.
सर्वसामान्य मतदारांचा विजय डॉ. नितीन रांधवण
वनकुटे सेवा सोसायटी मध्ये विरोधी गटाचा १३/० ने पराभव करत आम्ही जो विजय मिळवला तो विजय हा सर्वसामान्य मतदाराचा असून सर्वसामान्य मतदारांनी गावातील दहशतीचे राजकारण मोडीत काढले आहे यापुढील काळात सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करणार आहोत असे यावेळी डॉ. नितीन रांधवण यांनी प्रतिक्रिया दिली.
निवडणुकीत बोगस मतदान होत असल्याचे निदर्शनास
वनकुटे सेवा सोसायटीमध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना बोगस मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न करत सुरू होता. डॉ. नितीन रांधवण यांनी हे बोगस मतदान होत असल्याचे निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले व त्यावर आक्षेप नोंदविला यावेळी बोलताना डॉ. नितीन रांधवण म्हणाले की साधारण 70 ते 80 मतदान हे बोगस करण्याचा प्रयत्न झालेला आहे.