राहुल शिंदे पाटील यांचा उद्या अभिष्टचिंतन सोहळा रांजणगाव मशीद येथे कार्यक्रम पारनेर प्रतिनिधी : युवा नेते राहुल शिंदे पाटील यांच्या वाढदिवस...
राहुल शिंदे पाटील यांचा उद्या अभिष्टचिंतन सोहळा
रांजणगाव मशीद येथे कार्यक्रम
पारनेर प्रतिनिधी :
युवा नेते राहुल शिंदे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मित्र परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याच्याचे आयोजन दि.११ जून रोजी रांजणगाव मशीद येथे करण्यात आले आहे. राजकीय दृष्ट्या विचार करता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी राहुल पाटील शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सुपा जिल्हा परिषद गटात रांजणगाव मशीद याठिकाणी करण्यात आले आहे.
दरम्यान राहुल पाटील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच २ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व उद्धघटन सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी रांजणगाव मशीद या ठिकाणी सामाजिक उपक्रम म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सायंकाळी ६ वाजता विविध विकास कामांचे लोकार्पण या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील व राहुलदादा शिंदे पाटील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सुपा जिल्हा परिषद गटांमध्ये राहुलदादा शिंदे पाटील यांची ताकद मोठी आहे. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम यावेळी राबविण्यात येणार आहे. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या औचित्य साधत खास महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ही दौलत महाराष्ट्राची ची विशेष आकर्षण आहे.
तसेच या वेळी उपस्थितांसाठी स्नेह भोजनाचे ही आयोजन करण्यात आले आहे राहुल पाटील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातून जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित राहणार असल्याची माहिती रांजणगाव मशीदचे सरपंच इंद्रजीत उर्फ बंटी साबळे यांनी दिली आहे.