बहुआयामी समाजभिमुख व्यक्तिमत्त्व अॅड. बाबासाहेब खिलारी पाटील गणेश जगदाळे/पारनेर मनात जिद्द, चिकाटी असेल तर यश नक्की मिळते याचे उत्...
बहुआयामी समाजभिमुख व्यक्तिमत्त्व अॅड. बाबासाहेब खिलारी पाटील
गणेश जगदाळे/पारनेर
मनात जिद्द, चिकाटी असेल तर यश नक्की मिळते याचे उत्तम उदाहरण म्हणजेच टाकळी ढोकेश्वर येथील उद्योजक, कणखर राजकारणी समाजकारणी पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हा. चेअरमन अॅड.रघुनाथ उर्फ बाबासाहेब माधवराव खिलारी पाटील होय. त्यांचा जन्म टाकळी ढोकेश्वर येथील प्रतिष्ठित खिलारी पाटील कुटुंबात 20 जून 1962 रोजी झाला. त्यांचे वडील माधवराव व आई जिजाबाई हे दाम्पत्य शेती व्यवसाय करत होते. खिलारी पाटील कुटुंब हे सर्वसामान्य कुटुंब परंतु टाकळी ढोकेश्वर गावातील ते एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून पंचक्रोशी मध्ये ओळखले जाते.
परिसरातील राजकारणात समाजकारणात अध्यात्मिक व वैचारिक जडणघडणीमध्ये खिलारी पाटील कुटुंबाचे खूप मोठे योगदान आहे. लहानपणापासूनच अॅड.बाबासाहेब खिलारी पाटील यांच्यावर कौटुंबिक संस्कारांचा पगडा असलेला दिसतो. एकदम परखड भाषाशैली असलेले अॅड. बाबासाहेब खिलारी पाटील हे स्वभावाने तेवढेच मृदू पण आहेत. त्यांचे मोठे चुलते अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे विश्वस्त सिताराम'अण्णा खिलारी पाटील यांच्या सामाजिक विचारांचा त्यांच्यावर पहिल्यापासूनच प्रभाव असल्याचे दिसते. ऍड. खिलारी यांचे प्राथमिक शिक्षण टाकळी ढोकेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण श्री. ढोकेश्वर महाविद्यालयामध्ये झाले. त्यानंतर आपल्या वकिलीच्या शिक्षणासाठी त्यांनी नगर लॉ कॉलेजला प्रवेश घेऊन 1985 झाली ते वकील झाले. काही काळ वकिली केल्यानंतर व्यावसायिक दृष्टिकोन असलेले अॅड. बाबासाहेब खिलारी पाटील यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करतात व्यवसायात भरारी घेतली अनेक गरीब कुटुंबांना बेरोजगार युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला त्या माध्यमातून त्यांनी आर्थिक सामाजिक मदतही केली.
व्यवसायिक असलेले एडवोकेट खिलारी हे एक सामाजिक अधिष्ठान असून त्या माध्यमातून ते राजकारण समाजकारण हे करत असतात. तालुक्याचा राजकारणामध्ये खिलारी कुटुंबाचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. खिलारी कुटुंबाचे विखे कुटुंबाशी असलेले घनिष्ट नाते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे अॅड. बाबासाहेब खिलारी पाटील यांच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये खासदार बाळासाहेब विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे चुलते ज्येष्ठ नेते सीताराम अण्णा खिलारी पाटील विचारांचा प्रामुख्याने प्रभाव असल्याचे लक्षात येते. तसेच नगर दक्षिण चे खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे अॅड. बाबासाहेब खिलारी पाटील यांना नेहमीच सहकार्य असते. टाकळी ढोकेश्वर येथे राजकारण समाजकारण करत असताना अनेक सामाजिक उपक्रम राबविले गावातील अध्यात्मिक कार्यासाठी आर्थिक मदत शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य, कपडे खेळाडूंसाठी विविध प्रोत्साहनपर बक्षिसे त्यांनी वेळोवेळी दिले व विद्यार्थ्यांना खेळाडूंना मदतही केली.
या माध्यमातून काम करत असताना तालुकास्तरावर त्यांनी विविध पदांवर काम केले ते विखे पाटील गटाचे असूनही स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे ते पारनेर तालुक्यात खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नी सौ प्रतिभा बाबासाहेब खिलारी पाटील या 2007 साली टाकळी ढोकेश्वर पंचायत समिती गणा मधून तालुक्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या होत्या. तसेच त्या पारनेर तालुका दुध संघ व पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाच्या ही संचालिका राहिल्या आहेत. पंचायत समिती व सहकारी संस्थांच्या माध्यमातून टाकळीढोकेश्वर भागामध्ये अॅड. बाबासाहेब खिलारी पाटील यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली.
तालुकास्तरावर राजकारण करत असताना सुजीतराव झावरे पाटील यांच्या माध्यमातून २०१७ साली स्वतः अॅड. बाबासाहेब खिलारी पाटील यांना पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हा. चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्यांनी अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत. अॅड. बाबासाहेब खिलारी पाटील हे खऱ्या अर्थाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. टाकळी ढोकेश्वर तसेच पारनेर तालुक्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार असून त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. अशा या नेतृत्वास वाढदिवसानिमित्त हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा.
COMMENTS