--> संघर्षातून घडलेला अजातशत्रू बाळासाहेब झावरे पाटील | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

संघर्षातून घडलेला अजातशत्रू बाळासाहेब झावरे पाटील

संघर्षातून घडलेला अजातशत्रू बाळासाहेब झावरे पाटील गणेश जगदाळे/पारनेर  गरीब परिस्थिती असली म्हणून काय झालं, जिद्द चिकाटीला प्रचंड कष्टाची साथ...

संघर्षातून घडलेला अजातशत्रू बाळासाहेब झावरे पाटील


गणेश जगदाळे/पारनेर
 गरीब परिस्थिती असली म्हणून काय झालं, जिद्द चिकाटीला प्रचंड कष्टाची साथ असेल तर यशस्वी  उद्योजक होता येते हे वासुंदे  येथील श्र बाळासाहेब आनंदराव झावरे पाटील यांच्या जीवनपट पाहिल्यानंतर सहज लक्षात येते. घरची सर्वसामान्य परिस्थिती घरात पाटीलकी असली तरी सर्वसामान्य कुटुंब शेती हा आई-वडिलांचा मुख्य व्यवसाय
वयाच्या २४व्या वर्षी वडिलांचे निधन झाले घरी जमीन बेताची, परिस्थिती अत्यंत हालाखीची, गावाकडे दुष्काळ, व अवरशन यामुळे दोन भाऊ  दोन  बहिणीची जबाबदारी अशा वेळी  या तरुणाच्या खांद्यावर त्यामुळे रोजगारासाठी आपल गाव सोडलं व थेट वासुंदे ते भोसरी पुणे हा प्रवास सायकल वर केला. सुरवातीला छोटी छोटी कष्टाची कामे , नंतर भोसरी पुणे येथे कंपनी तील छोटी छोटी हॉटेल  चालवली प्रसंगी स्वतः व पत्नी या ठिकाणी काम केले, या व्यवसायातून स्थिरावल्या नंतर  वाहतूक व्यवसाय सांभाळत पुणे येथे निगडी प्राधिकरण येथे  स्थिरावले आपल्या छोट्या बंधू चे शिक्षण केले त्याला उच्च विद्या विभूषित केले व तो शासकीय अधिकारी म्हणुन काम करू लागला.  दोन बहिणीची उच्च शिक्षित केलं बाळासाहेब पाटील झावरे यांची दोन्ही मुले उच्च शिक्षित आहेत. एक पेट्रोलियम व्यवसायात बांधकाम व्यवसायात पिंपरी चिंचवड शहरात मोठे नाव आहे तर एक मुलगा बँकिंग क्षेत्रात उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहे  तर स्नुषा शिक्षिका आहेत. एक सुसंस्कारित व आदर्श कुटुंब त्यांनी उभे केले आहे. संस्कारक्षम पिढी त्यांनी घडवली आहे.
समाजकारण हा त्यांचा आवडता छंद पिंपरी चिंचवड येथील महानगर पालिकानिवडणूक त्यांनी २०१७ मध्ये त्यांनी लढविली त्यात त्यांना अपयश आले पण तरी थांबायचे नाही. आपल सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्य ते करतं असतात पिंपरी चिंचवड येथे प्रभाग क्रमांक १२ मधे रक्तदान शिबिर, धार्मिक कार्य , गणेश उस्तव या काळात विविध स्पर्धा क्रीडा स्पर्धा,  यांचे आयोजन शाळांमधील गोरगरीब   विदयार्थी यांना मदत करणे यातून समाजकार्य ते करतं आहे. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी काम केले व व्यवसायात ही प्रगती साधली. आपणं गरिबीतून आलो आहे ही जाणीव ठेवून सामजिक बांधिलकी जपण्यासाठी ते सतत काम करत आहे. समाजसेवेची आवड त्यांना लहानपणापासूनच होती.
निस्वार्थी शांत स्वभाव सर्वांशी हसुन खेळून वागणं मिञ मंडळ जपणं सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे यातून बाळासाहेब आनंदराव झावरे पाटील यांनी फार मोठा मिञ परिवार जमा केला आहे. मित्र परिवाराचे त्यांना नेहमी सहकार्य असते. वासुंदे या ठिकाणी सुद्धा ते सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेहमीच अग्रभागी राहून काम करतात ते वासूंदे विविध कार्यकारी सेवा संस्थेमध्ये तज्ञ संचालक म्हणून काम पहात आहेत. तसेच ते वासुंदे गावचे ग्रामदैवत श्री भाऊसाहेब महाराज सप्ताह कमिटी देवस्थान ट्रस्ट व बांधकाम समिती मध्येही ते सदस्य तसेच तज्ञ संचालक म्हणूनच काम करत आहेत गावातील ग्रामदैवताच्या या कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. श्री भाऊसाहेब महाराज सप्ताह कमिटी मध्ये धार्मिक कार्य ते करतं आहेत. आजही श्री भाऊसाहेब महाराज यांच्या मंदिर उभारणी साठी वेळ देवून ते काम करत आहे. बिरोबा महाराज मंदीरासाठी  व गावचे ग्राम दैवत श्री हनुमान मंदिरासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. गावच्या प्रत्येक चळवळीत निस्वार्थी भावनेने  काम,  ग्रामपंचायत, किंवा गावच्या विकास कार्यात त्यांचा सहभाग फार मोठा असतो अस एक आदर्श व्यकतिमत्त्व बाळासाहेब आनंदराव झावरे पाटील यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा.  गाव पातळीवर पारनेर तालुक्याचे भूषण लोकनेते माजी आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पारनेर तालुक्याचे सुसंस्कृत नेतृत्व सुजित पाटील झावरे  यांच्या नेतृत्वाखाली त्यांचें सामाजिक कार्य चालू आहे. आपल्या स्वभावाने सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हा मिञ आगामी काळात समाज कारण करणार असून या अजातशत्रू व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा..

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: संघर्षातून घडलेला अजातशत्रू बाळासाहेब झावरे पाटील
संघर्षातून घडलेला अजातशत्रू बाळासाहेब झावरे पाटील
https://lh3.googleusercontent.com/-vmtA-yUpabg/YqxRtaSpGfI/AAAAAAAAQks/cGPH4K7m8iIP9tzhpF0JsahXkGM-DTGiQCNcBGAsYHQ/s1600/IMG-20220617-WA0010.jpg
https://lh3.googleusercontent.com/-vmtA-yUpabg/YqxRtaSpGfI/AAAAAAAAQks/cGPH4K7m8iIP9tzhpF0JsahXkGM-DTGiQCNcBGAsYHQ/s72-c/IMG-20220617-WA0010.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/06/blog-post_27.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/06/blog-post_27.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content