कासारे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सहात संपन्न पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील कासारे येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर...
कासारे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सहात संपन्न
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील कासारे येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ कासारे यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त सर्वच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ कासारे यांच्या वतीने पारंपारिक पद्धतीने लेझीम व ढोल ताशाच्या गजरात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन अहिल्यादेवींची महाआरती करण्यात आली.
यांनातर कासारे गावातील सेवा निवृत्त झालेले शिक्षक, पोलिस तथा जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रा. रघुनंदन मोहिते (म. यशवंतराव होळकर जनसेवा संघ पुणे ) यांचे व्याख्यान झाले.
तसेच या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनोद गायकवाड, संपर्कप्रमुख संजय मोरे, प्रसिद्धीप्रमुख श्रीनिवास शिंदे, सदस्य किरण थोरात यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच धोंडिभाऊ दातीर, मेजर बाळासाहेब दातीर, श्री.बिरोबा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मंजारामशेठ दातीर, ज्ञानदेव दातीर, आदर्श शिक्षक संतोष दातीर सर, श्री.बिरोबा किटरर्स चे मालक संतोष दातीर, ग्रामविकास अधिकारी संपत दातीर. तसेच समस्त दातीर परिवार, शिंदे परिवार, वाव्हळ परिवार,भुसारी परिवार,रकटे परिवार,समस्त मुंबईकर,पुणेकर व नगरकर मंडळ, समस्त ग्रामस्थ कासारे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळातीळ सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक श्री. संतोष दातीर यांनी केले तर आभार माजी सरपंच धोंडिभाऊ दातीर यांनी मानले.
COMMENTS