पठार भागाच्या विकासाला प्राधान्य : सभापती काशिनाथ दाते सर किन्ही येथे रस्त्यासाठी १५ लाख तर तीन शाळा खोल्यांसाठी २८.५० लाखांचा निधी पारनेर प...
पठार भागाच्या विकासाला प्राधान्य : सभापती काशिनाथ दाते सर
किन्ही येथे रस्त्यासाठी १५ लाख तर तीन शाळा खोल्यांसाठी २८.५० लाखांचा निधी
पारनेर प्रतिनिधी :
जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२, लेखाशिर्ष ३०५४ अंतर्गत कान्हुर पठार, पिंपळगाव तुर्क, कुंभारवेस ते भहिरोबाची वाडी रस्ता (ग्रामा-४३) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे - १५ लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती मा. काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य आजाद ठुबे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भाई भोसले होते.
यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले उपसरपंच हारेराम खोडदे यांचे नेतृत्वाखाली काही दिवसापूर्वी येथील ग्रामस्थ माझ्याकडे रस्त्याची मागणी घेऊन आले या रस्त्यावर कुंभारवेस वस्ती आहे या गावच्या परिसरातील शेतकऱ्यांची शेती या रस्त्याच्या बाजूस असल्याने लोकांना जाणे येणे करीता व शेती वहिवाट करण्यास खूप अडचणी होता त्याचे काम मार्गी लावल्याचे समाधान आहे. आपण आम्हाला आमंत्रित केले आमचा मान सन्मान केला खूप मोठ्या संख्येने आपण येथे जमला आपले सर्वांच अभिनंदन करतो. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.
जिल्हा परिषदेमध्ये कान्हुर गटाचं नेतृत्व करत असताना मा.काशिनाथ दाते सरांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत किन्ही गावासोबतच संपुर्ण कान्हुरपठार गटातील जनतेसाठी उभ्या केलेल्या विकासकामांचा मला सार्थ अभिमान असुन उद्याच्या काळात राजकारणात व समाजकारणात काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची सामुहीक जबाबदारी ग्रामस्थांनी पार पाडणे गरजेचे असुन किन्ही गावचे ग्रामस्थ ती निश्चितपणे पार पाडतील अशी मला खात्री आहे.
आझाद ठुबे, माजी जि.प. सदस्य
यावेळी सरपंच पुष्पा खोडदे, उपसरपंच हरेराम खोडदे, ग्राम. सदस्य जयश्री खोडदे, नंदा परांडे, संतोष खरात, संदीप गोरे, जयश्री व्यवहारे,अश्विनी व्यवहारे, ग्रामसेवक घोलप, प्रभाकर परांडे, अनंता खोडदे , भानुदास खोडदे, साहेबराव खोडदे, आबा साकुरे, श्रीकांत निमसे, मनोज साकुरे, खंडेराव खोडदे ,दत्तात्रय गिरी, भाऊसाहेब खोडदे, बुवा खोडदे, सुभाष साकुरे, भिकाजी व्यवहारे, सोपान खोडदे ,विशाल निमसे, तानाजी साकुरे, संदीप खोडदे, चंद्रभान किनकर, विठ्ठल देठे, विठ्ठल खोडदे, शरद व्यवहारे, संतोष व्यवहारे, बाळू देशमुख, गणेश साकुरे, जयसिंग खोडदे, सिताराम देठे, पांडुरंग व्यवहारे, ज्ञानदेव खोडदे,
आबासाहेब खोडदे, गोवर्धन गोरे, उमाजी खोडदे, दिलीप खोडदे, सखाराम खोडदे, सोपान खोडदे, रमेश किनकर, दादाभाऊ खोडदे, भाऊसाहेब किनकर, आदेश परांडे, राहुल गोरे, अशोक खोडदे, अशोक किनकर, किरण खोडदे, यशवंत खोडदे,विनोद खोडदे, सौरभ खोडदे,भागा आतकर,
संतोष निमसे, जनार्दन आतकर, संतोष देशमुख, शंकर, खोडदे, सुभाष मुळे,दादा मोढवे कामाचे ठेकेदार इंजि. अतुल रोहोकले इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच हरेराम खोडदे यांनी केले तर आभार सरपंच पुष्पा खोडदे यांनी मानले.