कर्जुले हर्या जवळ अपघात; नगर-कल्याण महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच पारनेर प्रतिनिधी : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर अलीकडील काळामध्...
कर्जुले हर्या जवळ अपघात; नगर-कल्याण महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच
पारनेर प्रतिनिधी :
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर अलीकडील काळामध्ये अपघातांची संख्या वाढली असून त्यामध्ये अनेक निरपराधांना आपले जीव गमवावे लागत आहेत. नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर नसलेल्या दिशादर्शक यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास कर्जुले हर्या नजीक केवळ दिशादर्शक नसल्यामुळे अतिवेगवान असलेली मालवाहू पिकप गाडी एम. एच. २३ ए. यु. २९२६ ची हॉटेल साईराज जवळ ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे डांबरी रस्त्याच्या खाली गेली.
व हा किरकोळ अपघात घडला.
यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी हा घडलेला अपघात अतिवेगवान रस्त्यावर दिशादर्शक नसल्यामुळे घडल्याचे व चालक बेसावध असल्या कारणाने हा किरकोळ अपघात घडल्याचे प्रामुख्याने निदर्शनास आले आहे अपघातामध्ये कोणत्याही प्रकारे कोणाला सुदैवाने दुखापत झालेली नाही. अपघात घडल्यानंतर कर्जुले हर्या येथील स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावून आले होते रस्त्याच्या खाली गेलेली पिकप गाडी वर घेण्यासाठी यावेळी क्रेनची व्यवस्था करावी लागली. नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर असे किरकोळ अपघात दररोज घडत आहेत तर मोठेही अपघाताचे प्रमाण सध्या वाढलेली दिसते पाठी मागील पंधरा दिवसांमध्ये अनेक अपघात नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत.