वेब टीम : दिल्ली आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत आज भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात झालेला सामना ४-४ असा बरोबरीत सुटला...
वेब टीम : दिल्ली
आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत आज भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात झालेला सामना ४-४ असा बरोबरीत सुटला.
त्यामुळे गतविजेता भारत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचू शकला नाही. अंतिम सामना दक्षिण कोरियाला मलेशिया यांच्यात होईल.
तर, भारताला तिसऱ्या स्थानासाठी उद्या जपानबरोबर लढत द्यावी लागेल. आजच्या सामन्यात भारातातर्फे निलम संजीप क्षेस, दिपसन तिर्की, शेशे गौडा आणि मारीस्वर्ण सक्तीवेल यांनी गोल नोंदवले.
आंतरराष्ट्रीय हॉकी महसंघाच्या ताज्या मानांकनात भारतीय पुरुष संघाचं स्थान घसरुन चौथ्या क्रमाकांवर आलं आहे. मात्र, महिला संघाचं मानंकन वाढून सहाव्या क्रमाकांवर गेलं आहे.
ऑस्ट्रेलियानं पहिलं तर, नेदरलँडनं दुसरं स्थान कायम राखलं आहे, तर भारताच्या जागी तिसऱ्या स्थानावर नेदरलँडन झेप घेतली आहे.