बिबट्याचा जवळा परिसरात पुन्हा हल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पारनेर प्रतिनिधी : आठ दिवसांपासून लावलेल्या पिंजऱ्याला बिबट्या गुंगारा द...
बिबट्याचा जवळा परिसरात पुन्हा हल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
पारनेर प्रतिनिधी :
आठ दिवसांपासून लावलेल्या पिंजऱ्याला बिबट्या गुंगारा देत असून, जवळा येथील बरशिलेवस्तीवर रात्रीच्या भक्ष्याच्या शोधात फिरत असलेल्या बिबट्याने सतीश बरशिले यांच्या जर्सी गायीचे गोठ्यात बांधलेले वासरू झडप घालून फरपटत नेले. यात त्याचा मृत्यू झाला असून, ही घटना सोमवारी रात्री घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मागील आठवड्यात ही अशीच घटना घडल्याने नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याकडून अथक परिश्रम करत खूप दिवसांनी पिंजरा मिळवला. तो गेल्या आठवड्यात
पठारेवस्तीवर लावला असता बिबट्या; मात्र पिंजऱ्याजवळ येऊनही पिंजऱ्यात न जाता आठवड्यापासून गुंगारा देत आहे.
जवळा परिसरात बिबट्यांची संख्या वाढली असून, त्यांचा संचार मानवी वस्तींकडे वाढला आहे. ही भीतीदायक बाब असून, त्याकडे वनखात्याने गंभीरपणे लक्ष घालावे अशी मागणी माजी पंचायत समित सदस्य किसनराव रासकर, राष्ट्रवादी युवतीच्या राजेश्वरी कोठावळे शिवाजीराव सालके, उपसरपंच गोरख पठारे, पप्पू पठारे, नाथा रासकर प्रदीप सोमवंशी, नावनथ सालके, संपत् सालके, कानिफ पठारे, रंजना पठारे आदींनी केली.