प्रा. विलास साठे सर यांचा रविवारी सेवापूर्ती गौरव सोहळा चाळीस वर्ष अविरत शिक्षण सेवेत काम पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वासुंदे गाव...
प्रा. विलास साठे सर यांचा रविवारी सेवापूर्ती गौरव सोहळा
चाळीस वर्ष अविरत शिक्षण सेवेत काम
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वासुंदे गावचे सुपुत्र असलेले हिंद सेवा मंडळ अहमदनगर संचलित भारत विद्यालय मिरजगाव ता. कर्जत या विद्यालयाचे प्राचार्य राहिलेले मा. प्राचार्य विलास साठे सर हे आपल्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. चाळीस वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी असंख्य विद्यार्थी घडविले. प्राध्यापक विलास साठे सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ रविवार दिनांक ५ जून रोजी सकाळी १० वाजता माऊली सांस्कृतिक भवन नवीन टिळक रोड अहमदनगर या ठिकाणी होत आहे.
एक तज्ञ विचारवंत व्याख्याते प्रगल्भ असे तत्त्ववेत्ते आणि कुशाग्र बुद्धिमान शिक्षक व व्याख्याते असलेले प्राध्यापक विलास साठे सर हे शिक्षण सेवेतील प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत असल्यामुळे त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये अहमदनगर या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमा निमित्ताने विविध सामाजिक राजकीय अध्यात्मिक वैचारिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये होत असून सकाळी दहा वाजता जाहीर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे या परिसंवादासाठी प्राध्यापक डॉ. दिलीप चव्हाण शिक्षण तज्ञ स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापीठ नांदेड तसेच प्राध्यापक डॉ. एस. पी. लवांडे अध्यक्ष महाराष्ट्र प्राध्यापक संघटना महासंघ, हेरंब कुलकर्णी शिक्षण तज्ञ प्रा. पी. एस. निकम शिक्षक तज्ञ यांचे यावेळी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व आपण या विषयावर विशेष चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त प्रा. विलास साठे सर यांचा सत्कार व सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अहमदनगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर रोहिणीताई शेंडगे हिंदू सेवा शिक्षण मंडळाचे सचिव सुनील रामदासी एडवोकेट संघराज रुपवते रिपाइंचे राज्य संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव अशोक राव गायकवाड रवींद्र पटेकर हे मान्यवर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित राहणार आहेत सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव सोहळा समिती विशेष परिश्रम घेत आहे. बहुजन शिक्षक लोकशाही आघाडी अहमदनगर यांच्यावतीने या कार्यक्रमासाठी सर्व प्रा. विलास साठे सर यांच्या सहकार्यांना व प्रतिनिधींना तसेच मित्र परिवाराला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.