शिक्षण क्षेत्रात बी. एम. झावरे यांचे कार्य उल्लेखनीय : रा. या. औटी पारनेर/प्रतिनिधी : वासुंदे,ता.पारनेर येथील बाळासाहेब मारूती झावरे सर यां...
शिक्षण क्षेत्रात बी. एम. झावरे यांचे कार्य उल्लेखनीय : रा. या. औटी
पारनेर/प्रतिनिधी :
वासुंदे,ता.पारनेर येथील बाळासाहेब मारूती झावरे सर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य
उल्लेखनिय व कौतुकास्पद असून त्यांनी आपल्या शैक्षणिक सेवेच्या कालावधीमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अध्यापनाचे कार्य निस्वार्थीपणे केले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी यांनी केले. बी.एम. झावरे यांच्या मित्रमंडळाकडून नुकताच टाकळी ढोकेश्वर ता.पारनेर येथे सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी रा. या. औटी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, झावरे यांनी १९८४ साली कोपरगाव तालुक्यामध्ये सेवेस सुरुवात करुन तेथे सलग वीस वर्ष शिक्षण सेवा करत २००४ साली ते पारनेर तालुक्यात बदली होउन नांदूरपठार येथे सेवेत रुजु झाले व शेवटी वडगाव सावताळ येथे पदोन्नतीने मुख्याध्यापक पदापर्यत पोहचून नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले असून, त्यांनी सेवेच्या ठिकाणी आपल्या शैक्षणिक कामाचा वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करून अनेक चांगले विद्यार्थी घडविण्याचे पवित्र काम त्यांनी केले. तसेच त्यांचे शिक्षक संघटनेमध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची कायमच त्यांची तळमळ असायची.
याप्रसंगी गोरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव पानमंद, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन ए.के.ठुबे, श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेंचे चेअरमन बा.ठ.झावरे आदींनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब खिलारी, वासुंदे गावचे सरपंच भाऊ सैद, उपसरपंच शंकर बर्वे, वासुंदे सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे, व्हा.चेअरमन रामचंद्र झावरे, मा.चेअरमन दिलीप पाटोळे, छत्रपती संभाजी राजे पतसंस्थेचे चेअरमन संभाजी औटी, कान्हूर पठार पतसंस्थेचे संचालक पो.मा.झावरे, दादाभाऊ नवले, तसेच गिताराम जगदाळे, पी.डी. बर्वे, मंगेश खिलारी, किसन धुमाळ, सुरेश निवडुंगे, पत्रकार शरद झावरे, पत्रकार दादा भालेकर,
बापुसाहेब गायखे, बबनराव तळेकर, सुंदरराव झावरे, सोपान राऊत, शंकर बर्वे, प्रभाकर शिंदे, आनंदा झरेकर, सुभाष शिंदे, मारुती उगले, अंबादास झावरे, प्रविण झावरे, बाळासाहेब झावरे, रामदास झावरे, पांडुरंग बर्वे, संतोष खामकर, प्रल्हाद भालेकर, प्रकाश आंधळे, सुनिल सैद, साहेबराव गुंजाळ, तसेच बी.एम.झावरे यांचा मित्र परिवार, नातेवाईक व प्राथमिक, माध्यमिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिताराम जगदाळे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार बा. ठ. झावरे यांनी मानले.