वेब टीम : पुणे देशात नैऋत्य मोसमी पावसासाठी वातावरण अनुकूल बनलं असून, येत्या दोन ते तीन दिवसात कोकण आणि गोव्यासह देशाच्या किनारप...
वेब टीम : पुणे
देशात नैऋत्य मोसमी पावसासाठी वातावरण अनुकूल बनलं असून, येत्या दोन ते तीन दिवसात कोकण आणि गोव्यासह देशाच्या किनारपट्टीच्या काही भागात मान्सून पुढे सरकेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
दरम्यान, काल दुपारी नांदेड शहरातल्या काही भागांमध्ये सुमारे अर्धा तास वादळी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातही आज दुपारी काही वेळ वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
जिल्ह्याच्या इतर भागातही वादळी वारं आणि ढगाळ वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातही आज दुपारी वादळी पाऊस झाला.