कोव्हिड सेंटर चे सामान विकणाऱ्यांनी दाते सरांवर टीका करू नये : प्रियंका खिलारी पारनेर/प्रतिनिधी : शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियंकाताई...
कोव्हिड सेंटर चे सामान विकणाऱ्यांनी दाते सरांवर टीका करू नये : प्रियंका खिलारी
शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियंकाताई खिलारी म्हणाल्या सरपंचांनी सात कोटी रुपयांचे चालू कामे दाखवावेत आणि बक्षीस द्यावे, कोव्हिड सेंटरचे सामान विकणा-यांनी दाते सरांवर टीका करू नये. कधीही शाळेवर न जाणाऱ्यांनी अकलेचे तारे तोडले, विद्यार्थ्यांचे नुसकान न करता शाळेचा राजीनामा द्यावा व २४ तास राजकारण करावे.
ज्यांनी तालुक्याच्या राजकारणात गेली ४० वर्षे काम केले स्वत:वर कधी डाग पडू दिला नाही ज्यांचे राजकारण अख्या तालुक्याला माहित आहे अशा संयमी, शांत, बुद्धिमान नेतृत्व असलेले काशिनाथ दाते सर यांच्या विषयी घाणेरडे आरोप करून काही साध्य होणार नाही.
टाकळी ढोकेश्वर गाव व परिसरात आपल्या कुटुंबाची सर्व माहिती लोकांना आहे. यावर बोलून आम्ही आमची विचारसरणी खाली होऊ देणार नाही आपण केलेले विधानच आपली वैचारिक पातळी दाखवते. त्यामुळे विचार करून बोलले पाहिजे सभापती दाते सरांच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर गावात जे विकासाचे कामे मंजूर झाले यामध्ये पायमोडे वस्ती रस्ता, गावांतर्गत बांडे वस्ती ते आहेर ओढा रस्ता, विश्रामगृहाच्या जागेची संरक्षण भिंत, गावांतर्गत गवळी रस्ता, मळगंगा देवी सभा मंडप इत्यादी सर्व कामे ग्रामपंचायतीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे त्यांच्या निविदा निघणे बाकी आहेत. सभापती दाते सरांच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर गावातच जवळपास दोन कोटीची विकास कामे चालू आहेत.
काही पूर्ण झालेले आहेत आणि लोकांनाही ते माहित आहे. निविदा आडवणाऱ्यांनी दाते सरांवर टीका करू नये आतापर्यंत किती विद्यार्थ्यांचे नुसकान केले याचे आत्मपरीक्षण करावे आपण काय आहे, आम्हाला माहित आहे. ग्रामपंचायतीचे कामे ठेकेदार करत आहे. त्यांच्याकडून आपण किती कमिशन घेतात हेही टाकळी ढोकेश्वर गावातील ग्रामस्थांना माहित आहे. यावरती पण बोला. तालुक्याला सर्व माहित आहे अशी माहिती टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांनी निवेदनात दिली आहे. यामध्ये बबनराव पायमोडे सर, शिवाजीराव खिलारी, अक्षय गोरडे, विलास झावरे, संजय झावरे, नारायण झावरे साहेब इत्यादी ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
मुस्लिम समाजाचे कबरस्तान सुशोभीकरणाचे २५ लाख रुपयांचे काम उद्घाटना अगोदरच भिंत पडली, त्या कामाची चौकशी चालू असतानाही त्याची बिले आदा केली. टाकळी ढोकेश्वर मध्ये सात कोटींची कामे चालू आहेत त्यामध्ये ग्रामपंचायतीचे किती व आमदार निधीचे किती याचाही खुलासा सरपंचांनी करावा. गावात सरपंच यांचे आदर्श पतीच कारभार पाहतात, सोसायटीचे निवडणुकीमध्ये १३९ बोगस मते वाढवली, आमच्या नेत्याला टक्केवारीचा आरोप करताना ग्रामपंचायतीचे काम करणा-या ठेकेदार कडुन किती पैसे घेतात याचाही खुलासा करावा
शिवाजीराव खिलारी माजी सरपंच टाकळी ढोकेश्वर.