'जिल्हा मराठाने' सामाजिक बांधिलकी जोपासली; दुर्गादेवी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पारनेर/प्रतिनिधी : ग्रामीण आणि आदिव...
'जिल्हा मराठाने' सामाजिक बांधिलकी जोपासली; दुर्गादेवी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
पारनेर/प्रतिनिधी :
ग्रामीण आणि आदिवासी गोरगरिब विद्यार्थ्याना शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातुन ढवळपुरी परिसरातील सर्वसामान्य माणसाला नेहमी अधार देण्याचे काम केले. असे प्रतिपादन पारनेर पंचायत समितीचे मा. सभापती राहुल झावरे यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील दुर्गादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अयोजीत १०वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार व ग्राम पंचायत १५ व्या वित्त आयोगातुन क्रिडा साहित्याचे प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. यावेळी सरपंच डॉ. राजेश भनगडे, चेअरमन भागाजी गावडे, अहमद पटेल, नारायण चितळकर, अशोक फलके, सुखदेव चितळकर, महादेव जाधव, शिवाजी भालेराव, प्रेमराज राठोड, रमेश केदारी, नारायण वाघ, वडगाव सावताळचे सरपंच बाबासाहेब शिंदे, महादेव जाधव, शाम पवार, अकबर पठाण, भास्कर बिडे, सुनिल थोरात, बबन चौधरी, संतोष राठोड, भनगडेवाडीचे चेअरमन अमोल ठाणगे, केदार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राहूल झावरे म्हणाले की गुणवत्ता पुर्ण शिक्षण ही संस्थेचे प्रमुख उद्दिष्टे आहे. त्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठीच प्रथम प्राधान्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परिक्षेत चांगल यश संपादन केले. त्यांचा आदर्श इतर विद्यार्थ्यानी घ्यावा.
डॉ. राजेश भनगडे यावेळी बोलताना म्हणाले की कोरोना कालावधी मध्ये मोबाईल मध्ये हरवलेला विद्यार्थी त्यामधून बाहेर पाडण्यासाठी व मैदानी खेळ खेळुन आभ्यासात प्रगती करण्यासाठीच ग्रामपंचायत मार्फत खेळाचे साहित्य वितरी केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनीना शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले व गरजु विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी प्राचार्य सुनिल वाव्हळ, अजित सांगळे, दादासाहेब रोकडे, जनार्धन बनकर, कैलास मोकळ, संतोष व्यवहारे, निरज बोऱ्हाडे, संदिप म्हांडुळे, सहादु भोंडवे, संदिप खिलारी श्रीमती मंगल शेलार, श्रीमती शोभा गायकवाड, शब्बीर शेख, यमजी झेंडे, सतिष इंगळे, राम चौरे, फारूक शेख, श्रीमती पुजा गुंजाळ, श्रीमती रेणुका भागवत, श्रीमती सरविन पटेल आदी शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.