वनकुटे विविध कार्यकारी सेवा सोसायटीसाठी बुधवारी मतदान त्या ९२ मतदारांवर असणार निवडणुकीचा निकाल अवलंबून डॉ. नितीन रांधवण यांच्यामुळे सरपंच रा...
वनकुटे विविध कार्यकारी सेवा सोसायटीसाठी बुधवारी मतदान
त्या ९२ मतदारांवर असणार निवडणुकीचा निकाल अवलंबून
डॉ. नितीन रांधवण यांच्यामुळे सरपंच राहुल झावरे यांची प्रतिष्ठापणाला
वनकुटे सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार ?
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याच्या उत्तर पट्ट्यातील वनकुटे हे राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील गाव आदिवासी भागातील असलेले हे गाव तालुक्याच्या राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळखले जाते या गावच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून ही निवडणूक गुरुवार दि. ९ रोजी होत आहे. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके प्रणित ग्रामदैवत चरपटीनाथ महाराज परिवर्तन पॅनल व सर्वसामान्यांचा श्री चरपटीनाथ ग्रामविकास सहकार पॅनल एकमेकांच्या समोर रिंगणात उभा आहे. आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक वनकुटे गावचे सरपंच ऍड. राहुल झावरे पाटील यांच्यासाठी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची झाली असून या निवडणुकीत डॉ. नितीन रांधवण यांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता सर्वसामान्य लोकांना सोबत घेत सरपंच राहुल झावरे यांच्या समोर आव्हान उभे केले आहे. निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांच्या श्री. चरपटीनाथ ग्रामविकास सहकार पॅनलने आपला जाहीरनामा समोर ठेवला असून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून काम करत असताना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न मार्गी लावणार असून वनकुटे विविध कार्यकारी सेवा सोसायटी डिजिटल सेवा सोसायटी करून राज्यात एक आदर्श सेवा सोसायटी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून सरपंच राहुल झावरे पाटील यांनी मांडलेला राजकीय डाव यामुळे स्थानिक पातळीवर उभे राहिलेले राजकारण त्या कारणामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता वनकुटे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीकडे लागले आहे. श्री चरपटीनाथ ग्रामविकास सहकार पॅनलने या निवडणूक प्रचारात आघाडी घेतली असून सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेले डॉ. नितीन रांधवण यांनी निवडणूक एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागणार हे येणारा काळच सांगणार आहे.
डॉ. नितीन रांधवण व सरपंच राहुल झावरे यांच्या मध्ये खऱ्या अर्थाने ही सोसायटीची निवडणुकीची लढत होत असून जो वरचढ ठरणार तो यापुढील काळात वनकुटे परिसरामध्ये राजकीय सत्तेचा दावेदार असणार आहे. या दोन रांधवण व झावरे युवकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीनेही वनकुटे विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकीच्या आधी श्री चरपटीनाथ ग्रामविकास सहकार पॅनलने समोरील पॅनलवर विविध आरोप केले होते. वनकुटे सेवा सोसायटी मध्ये नव्याने सभासद झालेल्या ९२ सभासदांवर आक्षेप घेतला. सदर सभासद बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
परंतु त्यामुळे वनकुटे सेवा सोसायटीची निवडणुकीच्या निकालाची मदार ही त्या ९२ सभासदांवरच अवलंबून असून ते नवीन सभासद हे आपले मत कोणत्या पॅनलच्या पारड्यात टाकणार हे निकालाची दिशा ठरवणारे आहे. धक्कादायक म्हणजे ९२ सभासद हेच निकालाची दिशा बदलू शकतात असे स्थानिक पातळीवरून बोलले जात असून ९२ सभासदांवर दाखल केलेली याचिका हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने भविष्यात यावर काय निकाल येतो व त्यामुळे राजकीय परिस्थिती मध्ये काय बदल होतो हे पाहणे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिष्ठेच्या झालेल्या वनकुटे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा निकाल काय लागतो. डॉ. नितीन रांधवण यांच्यासोबत सर्वसामान्य मतदार उभा राहणार का ? कि सरपंच राहुल झावरे पाटील यांना साथ देणार हे उद्याच्या मतदान प्रक्रिया झाल्यानंतर लागणाऱ्या निकाला वरून स्पष्ट होईल.
त्या ९२ बोगस सभासद मतदारांची भूमिका काय ?
नव्याने घेण्यात आलेले ९२ मतदार बोगस असल्याचा आरोप केल्यानंतर न्यायालयात यासंदर्भात अपील करण्यात आलेले आहे परंतु वनकुटे विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची निवडणूक होत असल्याने उद्या त्या ९२ मतदारांना मतदानाचा अधिकार प्राप्त असल्याने त्या ९२ मतदारांची भूमिका नेमका काय ते उद्याच्या निकालावरून स्पष्ट होईल. श्री चरपटीनाथ ग्रामविकास सहकार पॅनल चे ज्येष्ठ नेते असलेले भानुदास गागरे, डॉ. नितीन रांधवण, दीपक गुंजाळ, पवन खामकर यांनी त्या ९२ बोगस मतदारांवर आरोप केलेले आहेत याचिकाकर्त्यांनी मतदार बोगस असून यांना निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही. अशी भूमिका न्यायालयासमोर मांडलेली असून हा संपूर्ण विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे भविष्यात निवडणूक झाल्यानंतर त्या मतदारांवर न्यायालय काय निकाल देणार हे पहाणे ही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
डॉ. नितीन रांधवण यांच्यासोबत उभा राहणार सर्वसामान्य मतदार !
वनकुटे विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही तालुक्याची लक्ष लागलेले सेवा सोसायटी असून या सेवा सोसायटीच्या माध्यमातून सरपंच राहुल झावरे यांच्यासमोर डॉ. नितीन रांधवण यांनी श्री चरपटीनाथ ग्रामविकास सहकार पॅनलच्या माध्यमातून आव्हान निर्माण केले. असून सर्वसामान्य मतदाराच्या माध्यमातून ते याठिकाणी लढत असून सर्वसामान्य मतदार डॉ. नितीन रांधवण यांच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचे जनतेच्या घेतलेल्या कानोस्यातून समजते. डॉ. नितीन रांधवण यांनी सर्वसामान्यांना हाताला धरत ही सेवा सोसायटीची निवडणूक हायजॅक केली असून प्रचार यंत्रणा प्रभावी राबविल्यामुळे प्रचारात आघाडी घेतल्याचे लक्षात येते सर्व उमेदवार प्रभावीपणे प्रचारामध्ये सहभागी असून उद्या होणाऱ्या मतदानानंतर निवडणुकीचा निकाल काय लागतो ते समजेल.