वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष.... कर्तुत्ववान महिला नेतृत्व जयश्रीताई साबळे पारनेर प्रतिनिधी : सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर नावलौकिक असलेल्या...
वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष....
कर्तुत्ववान महिला नेतृत्व जयश्रीताई साबळे
पारनेर प्रतिनिधी :
सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर नावलौकिक असलेल्या वडझिरे येथील गंधाक्ते घराण्याच्या कन्या आणि तेवढ्याच तोला मोलाच्या आणि प्रतिष्ठित रांधे तालुका पारनेर येथील साबळे घराण्याच्या स्नुषा सौ. जयश्रीताई साबळे यांचा २९ जून रोजी वाढदिवस
माहेर प्रमाणेच सासरी ही थोड्या फार प्रमाणात राजकीय वातावरण पती प्रविण साबळे यांना समाजकारणाची प्रचंड आवड आणि या आवडीतुन राजकीय नेते मंडळींशी नेहमी सबंध असणारे हे साबळे कुटुंब
सासरे लक्ष्मण साबळे माजी आमदार स्व. वसंतराव झावरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते तर दुसरे चुलत सासरे बाबाजी साबळे हे स्व. गुलाबराव शेळके आणि आता उदय शेळके यांचे जवळचे सहकारी आणि पती प्रविण साबळे हे आमदार निलेश लंके यांच्या अगदी पहिल्या फळीतील कार्यकर्ते अशा या राजकीय वातावरण असलेल्या कुटुंबात १८ मार्च २०१२ साली लग्न होऊन सौ. जयश्री साबळे यांचे आगमन झाले. सुरुवातीला कौटुंबिक जबाबदारी निभावत असताना पती प्रविण साबळे यांच्या सामाजिक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा त्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभाग वाढला.
आमदार लोकनेते निलेश लंके तसेच चिरंजीव प्रज्वल यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवून साबळे दाम्पत्याने समाजाशी बांधिलकी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला.
सध्या मुंबई मध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास असलेल्या या कुटुंबाने सामाजिक कार्यात कधीही अंतर पडू दिले नाही. आमदार निलेश लंके याच्या गुड बुक मध्ये प्रवीण साबळे यांचे स्थान असल्याने आणि गेली ३० ते ३५ वर्ष या कुटुंबाने स्थानिक राजकारणात आपली निष्ठा कायम ठेवल्याने २०२० मध्ये सौ. जयश्रीताई प्रविण साबळे यांच्या रूपाने रांधे गावच्या बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून स्थानिक नेतृत्वाने त्यांना राजकीय पटलावर काम करण्याची संधी दिली.
ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर सौ. जयश्रीताई साबळे आणि त्यांचे पती प्रविण साबळे यांनी जनतेशी असलेली नाळ तुटू दिली नाही.
आमदार निलेश लंके साहेबांशी असलेल्या जवळीकीमुळे सुरुवातीच्या काळात २५ लक्ष रुपयाच्या मंदिर सभामंडप आणि मजीद सुशोभीकरण यासाठी निधी मंजूर करण्यात सौ. जयश्रीताई साबळे याचा मोलाचा वाटा आहे.
त्याच प्रमाणे निघोज जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई वराळ यांच्या कडून ही कारवाडी मानमोडी शिंदे वस्ती ला जोडणाऱ्या रस्त्यास २० लक्ष रु मंजूर करण्यात सरपंच, उपसरपंच आणि इतर सदस्यान प्रमाणेच श्री. प्रविण साबळे यांनचे योगदान प्रामुख्याने आहे
अनेक वैयक्तिक शासकीय स्तरावरील योजना मिळून देण्यात ही सौ. जयश्री साबळे यांचे योगदान आहे.
यापुढील काळात ही आमदार साहेबान कडून अनेक विकासाची कामे मंजूर करून घेण्यास प्रयत्नशील असल्याचे सौ. साबळे यांनी बोलताना सांगितले
त्या मध्ये प्रामुख्याने रांधे विठ्ठल वाडी चोरदारा रस्त्या साठी मी आग्रही असून त्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. आमदार निलेश लंके साहेबांनी त्यासाठी आश्वासित केले आहे. तसेच मुस्लिम समाजासाठी शादिखाना साठी आग्रही असून त्याचा प्रस्ताव आमदार साहेबानी मागवून घेतला असून त्यावर काम सुरू आहे. लवकरच या कामाला मंजुरी मिळून देण्याचा प्रयत्न असणार आहे.
मुक्ताईनगर येथे गावठाण अंतर्गत येणाऱ्या सिंगल पेज साठी मी प्रयत्न सुरू केले असून शासन दरबारी सदर प्रस्ताव मंजुरी साठी असल्याचे सौ साबळे यांनी बोलताना सांगितले.
आमदार निलेश लंके यांच्या कट्टर समर्थक हीच त्यांची मुख्य ओळख आणि जमेची बाजू आहे.
साबळे कुटुंब आमदार निलेश लंके यांच्यासोबत एकनिष्ठ
आमदार निलेश लंके यांचे सहकारी प्रवीण साबळे यांच्यावर विशेष प्रेम आहे गावच्या विकासासाठी ही आमदार लंके त्यांना नेहमी मदत करतात आमदार निलेश लंके यांच्यासोबत त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. सौ जैसे प्रवीण साबळे हे आमदार निलेश लंके यांचे एकनिष्ठ सहकारी म्हणून सध्या तालुक्यात ओळखले जातात .