एस. टी. च्या स्मार्टकार्डला मुदतवाढ पारनेर आगार प्रमुख पराग भोपळे यांची माहिती पारनेर प्रतिनिधी : राज्य परिवहन महामंडळामार्फत विद्यार्थी, ...
एस. टी. च्या स्मार्टकार्डला मुदतवाढ
पारनेर आगार प्रमुख पराग भोपळे यांची माहिती
पारनेर प्रतिनिधी :
राज्य परिवहन महामंडळामार्फत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, पत्रकार, विविध पुरस्कारार्थी यांना देण्यात येत असलेले स्मार्ट कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती पारनेर आगाराचे आगारप्रमुख पराग भोपळे यांनी दिली.
कोरोनाची दुसरी लाट तसेच राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ज्येष्ठ नागरीकांना स्मार्टकार्ड प्राप्त करून घेण्याकरीता ३० जुन २०२२ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. आषाढी पंढरपूर यात्रा असल्याने या यात्रेमध्ये ज्येष्ठ नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या येत असलेल्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदवाढ देण्यात आल्याचे
राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थपकांनी पत्राद्वारे कळविले असल्याचे भोपळे यांनी सांगितले. दि. ३१ ऑगस्ट पर्यंत ज्येष्ठ नागरीकांना प्रवासाकरिता सध्याची प्रचलीत असलेली ओळखपत्रे ग्राहय धरण्यात येऊन प्रवास करण्यात मुभा देण्यात येणार आहे. त्यानंतर दि. १ सप्टेंबर पासून सध्या प्रचलित असलेली ओळखपत्रे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्यासाठी • ग्राहय धरण्यात येणार नाहीत. दि. ३१ ऑगस्टपर्यंत संबंधितांची स्मार्ट कार्ड वितरीत करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या असून कोणत्याही लाभार्थ्याचे स्मार्टकार्ड शिल्लक राहणार नाही अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. पारनेर आगाराच्या आखत्यारितील विविध लाभार्थ्यांनी त्यांचे स्मार्ट कार्ड विहीत मुदतीत घेऊन जाण्याचे आवाहन आगारप्रमुख भोपळे यांनी केले आहे.