रांध्यात पकडला गांजा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पारनेर/प्रतिनिधी : तालुयातील रांधे येथील सज्जन वस्ती येथे गांजाच्या ९५ झाडांची शेती करणा...
रांध्यात पकडला गांजा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पारनेर/प्रतिनिधी :
तालुयातील रांधे येथील सज्जन वस्ती येथे गांजाच्या ९५ झाडांची शेती करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. गांजाची शेती करणार्या आरोपी काशिनाथ दत्तात्रय आवारी (वय ३२, सज्जनवस्ती, रांधे, ता. पारनेर) याला पोलिसांनी अटक केली आहे. एलसीबीने मंगळवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई केली.
या प्रकरणी राहुल भाऊसाहेब सोळंके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत तीन लाख ६५ हजारांची गांजाची ९५ झाडे जप्त केली. रांधे येथे आरोपी आवारी याने गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना ही माहिती कळविण्यात आली. पोलिस अधीक्षक पाटील यांच्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, उपनिरीक्षक सोपान गोरे, सफौ. विष्णु घोडेचोर, पोहेकॉ. भाऊसाहेब कुरुंद, विजय वेठेकर, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना. राहुल सोळुंके, संदीप चव्हाण, शंकर चौधरी, पोकॉ. सागर ससाणे, रोहित येमुल, आकाश काळे, रोहित मिसाळ व चालक पोहेकॉ. उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.