वेब टीम : मुंबई अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं ९६ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा इथं होणार असल्याची घोषणा महामं...
वेब टीम : मुंबई
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं ९६ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा इथं होणार असल्याची घोषणा महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत केली.
विदर्भ साहित्य संघाचं यंदा शताब्दी वर्ष असल्यामुळे ९६ वं संमेलन विदर्भात व्हावं, अशी इच्छा विदर्भ साहित्य संघानं व्यक्त केली होती आणि संमेलनासाठी वर्धा हे स्थळ सुचवलं होतं.
हे संमेलन पुढच्या वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होईल, असंही तांबे यांनी यावेळी सांगितलं.
COMMENTS