पंचायत राज समितीकडे टँकर व बदली घोटाळ्याची दाद मागणार सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे पारनेर / प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यात नुकताच उघड झाले...
पंचायत राज समितीकडे टँकर व बदली घोटाळ्याची दाद मागणार
सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे
पारनेर / प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्ह्यात नुकताच उघड झालेला पारनेरचा टँकर घोटाळा व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांतील गैरव्यवहार याबाबत पंचायत राज समितीपुढे तक्रार कथन करण्याची तयारी लोकजागृती सामाजिक संस्थेने सुरू केली आहे. यासाठी या समितीकडे भेटी वेळ लोकजागृती सामाजिक संस्थेने मागितली आहे. याबाबतचे पत्र विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्य विधान मंडळाची पंचायत राज समिती (पीआरसी) नगर जिल्हा दौऱ्यावर येत्या २५ जूनला येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील घोटाळ्यांबाबत समितीपुढे तक्रार
करण्यात येणार आहे.
नुकताच उघड झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याबाबत व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांतील गैरव्यवहार याबाबत तक्रार समितीपुढे कथन करण्यात येणार आहे. त्यासाठी समितीचा काही वेळ राखीव ठेवण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे लोकजागृतीच्यावतीने करण्यात आली आहे टँकर घोटाळा दडपण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासनातील काही अधिकारी प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत पंचायत राज समितीसमोर आमच्याकडे असलेले पुरावे सादर करायचे आहेत. तरी त्यासाठी आम्हाला वेळ मिळावा व यासाठी आपण समितीच्या नियोजित कार्यक्रम पत्रिकेत वेळेची तशी तरतूद करावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. आमच्या या मागणीचा विचार न केल्यास संघटनेचे कार्यकर्ते समितीच्या दौऱ्यादरम्यान लोकशाही मार्गाने सत्याग्रह आंदोलन करतील, असा इशारा देखील देण्यात आला असल्याची माहिती लोक जागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी दिली.