वाढदिवस विशेष सर्वसामान्य जनतेचा पठार भागावरील बुलंद आवाज अशोकराव घुले जनतेच्या हितासाठी काम करणारे नेतृत्व आमदार निलेश लंके यांचे युवा शिले...
वाढदिवस विशेष
सर्वसामान्य जनतेचा पठार भागावरील बुलंद आवाज अशोकराव घुले
जनतेच्या हितासाठी काम करणारे नेतृत्व
आमदार निलेश लंके यांचे युवा शिलेदार
पठार भागावरील जनतेचा खरा न्यायधीश
युवकांचे संघटन असलेलं नेतृत्व
सर्वसामान्यांचा तारणहार
गणेश जगदाळे/पारनेर
पिंपळगाव रोठा पारनेर तालुक्यातील पठार भागावरील महत्त्वपूर्ण गाव महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान या गावचे वैभव पिंपळगाव रोठा पठार भागावर असल्यामुळे दुष्काळ नेहमीच पाचवीला पुजलेला अशा या ग्रामीण भागामध्ये अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस, पिंपळगाव रोठाचे माजी सरपंच अशोक महादू घुले यांचा जन्म १ जुन १९७९ साली झाला. घरची परिस्थिती जेमतेम घरात सामाजिक राजकीय ठेवण पूर्वीपासूनच होती. अशोक घुले यांनी शालेय शिक्षण गावातच घेत गावापासून वीस किलोमीटर असलेल्या टाकळी ढोकेश्वर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर पुढे नोकरीच्या शोधात मुंबई या ठिकाणी ते १९९७ ला गेले नोकरी करत असतानाच व्यवसायिक असलेला त्यांचा दृष्टिकोन त्यांना कामी आला व मुंबईमध्ये स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. कुटुंबाची आर्थिक घडी हळूहळू त्यांनी बसवण्यास सुरुवात केली. मोठे कुटुंब असल्यामुळे त्यांना कुटुंबाची चांगली साथ मिळाली. भारदस्त शरीरयष्टी असलेले अशोकराव त्यांच्या मित्रपरिवारामध्ये प्रिय असल्यामुळे पिंपळगाव रोठा व परिसरामध्ये त्यांनी सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करण्यास सुरुवात केली त्या माध्यमातून परिसरातील अनेक सर्वसामान्य गरीब दलित कुटुंबाला त्यांनी नेहमी आधार देण्याचा प्रयत्न केला. हसतमुख असलेले अशोकराव घुले नेहमी सर्वांसोबत प्रेमाने राहतात त्यांच्या मित्रपरिवाराला ते जपतात त्यामुळे त्यांना पिंपळगाव रोठा तसेच पारनेर तालुक्यात मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे आजोबा कृष्णाजी नारायण घुले हे पिंपळगाव रोठाचे सरपंच तर पारनेर पंचायत समितीचे सदस्य होते घरातच असलेले कौटुंबिक राजकीय सामाजिक वातावरण हे अशोकराव घुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे ठरले.
घरात असलेले सामाजिक, राजकीय वातावरण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये दिशा देण्यासाठी कारण ठरले. त्यामुळे अशोकराव घुले आपोआपच गावच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय झाले. पिंपळगाव रोठा या गावचा विकास झाला पाहिजे ग्रामीण बाज गावचा पुसला गेला पाहिजे. ही भूमिका ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी अशोक घुले हे कामाला लागले. ग्रामस्तरावर काम करत असताना त्यांनी गावात अनेक सामाजिक उपक्रम हाती घेत गावचा कायापालट केला. गावातील ग्रामस्थांच्या आग्रहाखातर त्यांनी राजकारणात उडी घेतली व पिंपळगाव रोठा गावची ग्रामपंचायत निवडणूक लढवत २०१६ साली ते गावचे सरपंच झाले. सरपंच झाल्यानंतर गावचा विकास कशा पद्धतीने करता येईल ही मनाशी खूणगाठ बांधून त्यांनी ग्रामस्तरावर गावच्या विकासासाठी शासकीय विविध योजना त्यांनी राबविल्या. शेतकरी कष्टकरी समाजासाठी त्यांनी विविध शासकीय योजना ग्रामस्तरावर राबवल्या असून विविध खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मदतही केली आहे.
दुष्काळी कालावधीमध्ये गावात स्वखर्चाने त्यांनी पाण्याच्या टॅंकरने वेळोवेळी अडचणीच्या वेळी पाणीपुरवठा ही केला आहे. अशोकराव घुले यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात पिंपळगाव रोठा याठिकाणी जलसंधारणाचे जवळजवळ गावात तीन कोटी रुपयाचे विविध विकास कामे मार्गी लावली. त्या माध्यमातून पिंपळगाव रोठा हे पठार भागावरील एक दुष्काळी गाव आहे ही ओळख पुसली गेली. गावातील अनेक विकासात्मक कामे मार्गी लागल्यामुळे सरपंच अशोकराव घुले यांची लोकप्रियता सर्वदूर पसरली. देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राजकीय विचारांना मानून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोबत अशोकराव घुले हे काम करू लागले. ग्रामस्तरावर अशोकराव घुले यांनी केलेले कार्य पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेऊन ग्रामीण भागातील या युवा नेतृत्वाला त्यांनी खर्या अर्थाने पक्षसंघटनेत काम करण्याची संधी दिली पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी व आता अहमदनगर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी ते काम करत आहेत.
अशोकराव घुले हे सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पूर्ण जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी काम करू लागले. त्या माध्यमातून जिल्ह्यात व तालुक्यात त्यांचा मोठा संपर्क वाढला. पारनेर तालुक्यात २०१९ साली आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक मतानी निवडून आले. आमदार निलेश लंके यांना पारनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी करण्यामध्ये खऱ्या अर्थाने अशोकराव घुले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अशोकराव घुले हे आमदार निलेश लंके यांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून सध्या जिल्ह्यात ओळखले जातात. आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पिंपळगाव रोठा परिसरामध्ये आज अनेक विकास कामे अशोकराव घुले यांनी मार्गी लावली आहेत. तालुका स्तरावर अशोकराव घुले यांचे आमदार निलेश लंके यांच्यासाठी सुरू असलेले काम हे उल्लेखनीय असून तालुक्यात त्यांनी प्रत्येक गटात व गावात मोठा मित्रपरिवार निर्माण केला आहे. पठार भागावर काम करत असताना पठार भागाचा बुलंद आवाज म्हणून जिल्ह्यात आता अशोकरावांची ओळख तयार झाली आहे.
ग्रामस्तरावर काम केल्यामुळे अशोकरावचे प्रशासन व शासन यांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा आपल्या तालुक्यातील व पठार भागावरील जनतेला लाभ मिळवून देत आहेत. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी काम करताना अशोकराव घुले हे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असून पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कंबर कसली आहे. पठार भागावर असलेल्या पिंपळगाव रोठा, अक्कलवाडी, वडगाव दर्या, कानूर पठार, गारगुंडी, कारेगाव या भागामध्ये काम करताना अशोकराव घुले यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्ष संघटना बळकट केली असून या भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पिंपळगाव रोठा सारखी विविध कार्यकारी सेवा सोसायटी सुद्धा अशोकराव घुले यांच्या ताब्यात असून सहकार क्षेत्रातही त्यामुळे त्यांचे सुरू असलेले काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. अशोकराव घुले यांच्या पत्नी शालिनी अशोक घुले या पारनेर तालुका संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी सध्या कार्यरत आहेत. शेतकरी कष्टकरी समाजाला फायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी सेवा सोसायटीच्या माध्यमातून अशोकराव घुले हे काम करत आहेत. आमदार निलेश लंके यांचा त्यांना असलेला पाठिंबा त्यांच्या भविष्यातील राजकारणाला नक्कीच दिशा देऊ शकतो. भविष्यात पठार भागावर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार साहेब व आमदार निलेश लंके यांचा शिलेदार ते नक्कीच निवडून देतील यात शंका नाही.
त्यामुळे युवा सरपंच राहिलेले व सध्या अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस असलेले अशोकराव घुले यांना तालुक्याच्या राजकारणात नक्कीच भविष्य आहे. आपल्या या अनुभवसंपन्न आशा सहकाऱ्याला आमदार निलेश लंके हे योग्य वेळी योग्य ठिकाणी संधी देऊन नक्कीच दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. अशोकराव घुले यांच्या सोबत वाढदिवसानिमित्त झालेल्या चर्चेत बोलताना ते म्हणाले मी यापुढील काळात नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार आहे जनतेचे प्रश्न सोडवताना मला नेहमीच आनंद वाटतो. पठार भागावरील जनता ही सर्वसामान्य असून या जनतेला न्याय देणार असून पठार भागावरील पाण्याच्या प्रश्नासाठी ही यापुढील काळात मी निश्चितच काम करणार आहे. तसेच आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पठार भागाचा पाण्याचा प्रश्नही सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे. शेतकरी कष्टकरी दिन दलित समाजासाठी शासकीय योजना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये राबवून जनतेला योग्य न्याय देण्याचा मी यापुढील काळात प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले अशा या उदयन्मुख युवा नेतृत्वाला व पठार भागाच्या ढाण्या वाघाला वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा त्यांना या पुढील काळात राजकीय सामाजिक यश मिळो हीच सदिच्छा...